Who Is Raj Shamani: देशातच नव्हे जगाच्या पाठीवर पॉडकास्टिंग आणि डिजिटल संवादाच्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. या प्रवाहात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नावांमध्ये अवघ्या 28 वर्षीय राज शामनीचा (Raj Shamani) समावेश होतो. उद्योजक, लेखक आणि पॉडकास्टर अशी त्याची ओळख आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्राॅन यांच्यासोबत भारत दौऱ्यात केलेल्या पॉडकास्टने पुन्हा एकदा राज शमानीची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्यासोबत राज शामनीने पॉडकास्ट केला होता. देशभरात पॉडकास्टर आणि युट्युबर्सची चर्चा होत असतेच, पण राज शामनीने आजपर्यंत अब्जाधीश उद्योजक बिल गेट्सपासून ते पळपुट्या विजय मल्ल्यासोबत तब्बल 4.3 तासांचा पॉडकास्ट करत आपल्या प्रतिभेची झलक 28व्या वर्षीच दिली आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक सबस्क्राइबर्स असलेल्या यूट्यूबर्समध्ये राज शमानीचा समावेश नसला, तरी भारतातील बिझनेस आणि मोटिव्हेशनल पॉडकास्ट क्षेत्रात आघाडीवर मानला जात आहे.
इंदूरमधून सुरू झालेला प्रवास (Who is Raj Shamani)
मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेल्या राज शामनीने अल्पवयातच व्यवसायात पाऊल टाकले. कुटुंबाचा साबण व्यवसाय सांभाळताना मार्केटिंग, विक्री आणि व्यवस्थापनाचे धडे प्रत्यक्ष अनुभवातून घेतले. पुढे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
‘Figuring Out’मुळे ओळख मिळाली
2021 नंतर राज शमानीने Figuring Out with Raj Shamani पॉडकास्ट सुरु केला. यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. या पॉडकास्टमध्ये व्यवसाय, अर्थकारण, करिअर, वैयक्तिक विकास आणि राजकारण या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाते. दीर्घ आणि सखोल मुलाखती ही या पॉडकास्टची वैशिष्ट्ये मानली जातात. विशेष म्हणजे मल्ल्यासोबत 4.3 तासाच्या पॉडकास्टनेच तो सर्वात पहिल्यांदा भारतातून फरार झाल्यानंतर जाहीरपणे प्रकट झाला.
कोणकोण आले आहेत सेलिब्रेटी?
राज शामनीच्या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 500 हून अधिक पाहुण्यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये बिल गेटस यांच्यासह आमीर खान, करण जोहर, माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी सुद्धा सहभागी झाला आहे. तसेच केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे नेते, धोरण विश्लेषक आणि युवा राजकारणी अशा अनेक राजकीय व्यक्तिमत्त्वांनीही त्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्यांच्या पॉडकास्टवर 50 पेक्षा अधिक सेलिब्रेटी आणि राजकीय व्यक्ती विविध भागांमध्ये झळकल्या आहेत. राज शामनीची शैली थेट प्रश्न विचारण्याची आणि पाहुण्याला सविस्तर उत्तर देण्याची आहे. वादग्रस्त मुद्द्यांवरही चर्चा करतो. त्यामुळे मुलाखती अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. राज शामनीने Build, Don't Talk हे पुस्तकही लिहिलं आहे.
राज शमानीचा प्रभाव किती?
जागतिक स्तरावर सर्वाधिक सबस्क्राइबर्स असलेल्या यूट्यूबर्समध्ये राज शमानीचा समावेश नसला, तरी भारतातील बिझनेस आणि मोटिव्हेशनल पॉडकास्ट क्षेत्रात आघाडीवर मानला जातो. त्याच्या यूट्यूब चॅनेलला कोट्यवधी सबस्क्राइबर्स असून भागांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. चर्चांमध्ये केवळ प्रसिद्धीपेक्षा अनुभव, अपयश, धोरण आणि वैयक्तिक प्रवासावर भर असतो. त्यामुळे त्याच्या प्रेक्षकवर्गात विद्यार्थी, स्टार्टअप संस्थापक, तरुण व्यावसायिक आणि धोरणात रुची असलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
