Diamond Heiress Devanshi Sanghvi : हिरे व्यापाऱ्याच्या आठ वर्षीय मुलीने (Daughter of Diamond Merchant) ऐशोआरामाचे आयुष्य झुगारून साध्वी होण्याचा मार्ग निवडला आहे. गुजरातच्या (Gujrat) सुरतमधील हिरे व्यापारी कुटुंबातील देवांशी संघवी (Devanshi Sanghvi) या आठ वर्षीय मुलीने सर्व सुखसोयींचा त्याग करून जैन साध्वी म्हणून दीक्षा घेतली. बुधवारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला  35 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. अनेक संत-मुनींच्या उपस्थितीत आचार्य कीर्तियश सुरीश्वर महाराज यांच्या हस्ते देवांशी हिने जैन साध्वी म्हणून दीक्षा घेक संन्यास मार्गाच्या जीवन प्रवासाला सुरुवात केली आहे. देवांशीच्या दीक्षा महोत्सवासाठी घोडे, हत्ती, उंट यांच्या उपस्थिती मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होते.


मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती


चिमुकल्या देवांशीच्या दीक्षा महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. हिरे व्यापाऱ्याच्या मुलीने एवढ्या कमी वयात साध्वी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवांशी साध्वी झाल्यानंतर तिला निरोप देताना तिचे कुटुंबीय अतिशय भावूक झाले होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


देवांशी हिरे व्यापारी धनेश संघवी यांची मुलगी 


देवांशी 100 कोटींची वार्षिक उलाढाल असलेले गुजरातमधील हिरे व्यावसायिक धनेश संघवी यांची मुलगी आहे. धनेश संघवी यांची संघवी अँड सन्स कंपनी सर्वात जुन्या हिरे कंपनीपैकी एक आहे. धनेश संघवी यांना दोन मुली असून देवांशी त्यांची मोठी मुलगी आहे. देवांशी संघवी ही संघवी मोहनभाई यांची नात आणि भेरुतारक तीर्थ धामचे संस्थापक संघवी भेरमल हकमाजी यांच्या कुटुंबातील संघवी धनेश-अमी बेन यांची मुलगी आहे. देवांशीचे आईवडील सांगतात की, ती नेहमी मोबाईल-टीव्हीपासून दूर राहिली. देवांशीने आतापर्यंत 367 दीक्षा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.


जैन साध्वी होण्यासाठी कठोर तपश्चर्या


दीक्षा घेण्यापूर्वी, देवांशीने भिक्षुंसोबत पायी 600 किमीचा प्रवास केला आणि अनेक कठीण तपस्येनंतर तिला तिच्या गुरूंनी संन्यास घेण्याची परवानगी दिली. जैनाचार्य कीर्तिसुरीश्वरजी महाराज यांच्याकडून देवांगीने दीक्षा घेतली आहे.


देवाशींला साधं जीवन जगण्याची आवड


देवांशीला फार कमी वयात साधू संतांची संगत लाभली. तिने खूप कमी, वयातच जप, व्रत करण्यास सुरुवात केली होती. करोडोंची संपत्ती असूनही संपूर्ण संघवी कुटुंबाची जीवनशैली अत्यंत साधी आहे. देवांशीचा ऐशोआरामाच्या जीवनाचा त्याग करण्याचा निर्धार होता, यामध्ये तिला तिच्या कुटुंबियांनी साथ दिली आहे.


देवांशीला संगीताचेही ज्ञान


देवांशीने अनेक धर्मग्रंथांचे वाचन केले आहे. देवांशीला संगीताचेही ज्ञान आहे, तिला संगीतातील सर्व राग येतात. याशिवाय देवांशीला स्केटिंग, भरतनाट्यम, योगाही शिकली आहे. देवांशीला संस्कृत, हिंदी, गुजराती, मारवाडी आणि इंग्रजी या पाच भाषा येतात.