Special significance of Magh month : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष स्वतःचे महत्त्व असते. काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, कालपासून माघ महिन्याला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात माघ महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान, स्नान, व्रत आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे या महिन्यात लोक गंगेत स्नान करण्यासाठी हरिद्वार, प्रयागराजसारख्या धार्मिक स्थळी जातात. धार्मिक दृष्टिकोनातून गंगेत स्नान करणारी व्यक्ती शरीर आणि आत्म्याने पवित्र बनते असा समज आहे. 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत हा माघ महिना चालणार आहे. 


इंद्रदेवाला गौतम ऋषींचा शाप, मुक्तीसाठी गंगेत स्नान


पौराणिक कथेनुसार, माघ महिन्यात इंद्रदेवाला गौतम ऋषींनी शाप दिला होता. आपली चूक लक्षात घेऊन इंद्रदेवाने गौतम ऋषींची माफी मागितली होती. तेव्हा गौतम ऋषींनी इंद्रदेवाला माघ महिन्यात गंगेत स्नान करून चुकांचे प्रायश्चित्त करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी याच महिन्यात गंगेत स्नान केले. भगवान इंद्राला गंगेत स्नान केल्यावरच शापापासून मुक्ती मिळाली. तेव्हापासून माघ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावास्येला गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. 


माघ महिन्यात पवित्र नदीत स्नान आणि दान इत्यादी अतिशय शुभ मानले जाते. माघ महिन्यात अनेक धार्मिक सण येतात तसेच निसर्गही अनुकूल होऊ लागतो. या महिन्यात संगमावर कल्पवास देखील केला जातो यामुळे व्यक्ती शरीर आणि आत्म्यापासून पवित्र होते. माघ महिन्याच्या सकाळी श्रीकृष्णाला पिवळी फुले अर्पण करून पंचामृत अर्पण करावे. माघ महिन्यात कृष्णाच्या मंत्रांचा जप करावा आणि पवित्र नदीत स्नान करावे. एखाद्या गरीबाला नियमित अन्नदान करावे. शक्य असल्यास एकाच वेळी जेवण करा. 


महत्त्वाच्या बातम्या: