Mamata Banerjee On Democracy : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृपया लोकशाही वाचवा अशी विनंती सरन्यायाधीशांना केली आहे. लोकशाही आणि संघ राज्य संरचनेच्या सुरक्षेला तडा जाऊ नये, लोकशाही वाचवा अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी सरन्यायाधीश यू यू ललित यांना केली आहे. देशाला राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने नेणाऱ्या एका वर्गाच्या हातात लोकशाही शक्ती एकवटल्याचा दावा बॅनर्जी यांनी केलाय.
ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरीडिकल सायन्सेस (NUJS) च्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश यू यू ललित देखील उपस्थित होते. यावेळी ममता बॅनर्जी यांनी देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न उपस्थित करत कृपया लोकशाही वाचवा असे आवाहन केले.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
प्रसारमाध्यमांचा संदर्भ देत ममता बॅनर्जी म्हणाल्या , "ते कोणाला काही बोलू शकतात का? ते कोणाला दोष देऊ शकतात का? सर आमची प्रतिष्ठा हाच आमचा सन्मान आहे. ती निघून गेली तर सर्व काही संपेल. जर तुम्हाला माझी चूक वाटत असेल तर मी माफी मागते." यावेळी ममता बॅनर्जी यांनी सरन्यायाधिशांचे कौतुक देखील केले. "मी न्यायमूर्ती यूयू ललित यांचे अभिनंदन केले पाहिजे. दोन महिन्यांत त्यांनी न्यायव्यवस्था म्हणजे काय हे दाखवून दिले आहे.” अशा भावना यावेळी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्या.
लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे असे मी म्हणत नाही. परंतु. अलीकडे परिस्थिती खूप बिकट झाली आहे. न्यायव्यवस्थेने जनतेला अन्यायापासून वाचवले पाहिजे आणि त्यांचे गाऱ्हाणे ऐकले पाहिजे. सध्या लोक बंद दाराआड रडत आहेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या