Wheather Update Today : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने (Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवार आणि रविवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज यलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, पुढील 5 ते 6 दिवस दिल्लीत अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ओडिशातील 12 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. आज सुंदरगड, झारसुगुडा, बारगढ, बोलंगीर, सोनपूर, संबलपूर, देवगड, अंगुल, केओंझार आणि बौध येथे मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. पावसामुळे आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 लोक बेपत्ता आहेत. IMD 3 आणि 4 ऑगस्ट रोजी बिलासपूर, चंबा, कांगडा, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौरमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 


आठवडाभर असेल पाऊस


या आठवड्यात दिल्लीचे हवामान आल्हाददायक असेल. 6 ऑगस्टपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गुरुग्राम, गाझियाबादसह एनसीआरच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.


उत्तर प्रदेशच्या 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा


लखनौ आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रक्रिया 6 ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने हमीरपूर, जालौन, झाशी, ललितपूर, महोबा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आग्रा, औरैया, इटावा, फतेहपूर, कानपूर देहत, कानपूर नगर, प्रयागराज, रायबरेली आणि उन्नावसह अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मोहम्मद. दानिश म्हणाले की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सध्या, त्याची ट्रफ लाइन गोरखपूर, गया आणि पश्चिम बंगालमार्गे ईशान्येकडे सक्रिय आहे. त्याच्या प्रभावाखाली, 6 ऑगस्टपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.


देशाच्या या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा


हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी


हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि भूस्खलन सुरू आहे. IMD ने आज बिलासपूर, चंबा, कांगडा, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौरमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 24 जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून, हिमाचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 194 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 34 बेपत्ता आहेत.


ओरिसात मुसळधार पावसाचा इशारा, शाळा बंद


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मुसळधार पावसामुळे ओरिसातील अनेक सखल भागात पूर आला आहे. 12 हून अधिक जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्था तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने सुंदरगड, झारसुगुडा, बारगढ, बोलंगीर, सोनेपूर, संबलपूर, देवगड, अंगुल, केओंझार आणि बौध येथे मुसळधार ते अति मुसळधार (7 ते 20 सेमी) पावसाचा इशारा दिला आहे.