Cold Weather : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठं पावसाची (Rain) हजेरी असा खेळ सुरु आहे. उत्तर भारतात (North India) थंडीचा कडाका कायम आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान कालच्यापेक्षा आज दिल्लीकरांना (Delhi) थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत  आज 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तापमानात (Temperature) घट नोंदवली जाणार आहे. 14 जानेवारी  ते 16 जानेवारी दरम्यान उत्तर भारतात तापमानाचा पारा 5 अंशांपर्यंत खाली येण्याचा शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


Rain : 'या' भागात पावसाची शक्यता


वेस्टर्न डिस्टर्बन्सचा जोर कायम आहे. त्यामुळं पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या लगतच्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान गुरुवारी दिल्लीतील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली होती. आज जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


Temperature : तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता


सध्या राजधानी दिल्लीचे तापमान सकाळी 12.2 अंश सेल्सिअस आहे.  ते पालममध्ये नोंदवले गेले आहे. चंदीगडमध्ये 11 अंश सेल्सिअस, लखनऊमध्ये 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत वायव्य भारत आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअस होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 15 जानेवारीपर्यंत तापमान 3 ते 6 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.  त्यानंतर कोणताही विशेष बदल होणार नाही. पुढील 4 ते 5 दिवसांत उर्वरित देशाच्या किमान तापमानात कोणताही विशेष बदल होणार नाही. 


कर्नाटकसह मध्य प्रदेशातही थंडीचा जोर वाढणार 


15 ते 18 तारखेला उत्तर राजस्थानच्या काही भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या वेगळ्या भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच  कर्नाटकात 13 आणि 14 जानेवारीला, तर मध्य प्रदेशात 16 आणि 17 जानेवारीला थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nandurbar: कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, पिकांची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन