Today Weather Update : देशातील विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सध्या उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं (meteorological department) देशातील विविध राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.


आज कुठे कुठे पावसाचा अंदाज


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही बहुतांश शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज सांगितला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यानं स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडं हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग आणि पूर्व गुजरातमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.


महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट


राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. हवामान विभागानं  दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगलाच पाऊस झाला.  औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील पालघर, जळगाव, नंदूरबार, धुळे, पुणे जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. आज कोककणसह, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र  तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसला आहे. सध्या पिकं काढणीचा हंगाम सुरु आहे. अशातच पाऊस झाल्यानं सोयाबीनसह कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं सांगितली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : आज कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा 'यलो' अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन