Weather Forecast India : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. उत्तर भारतात (North india) सध्या तापमानात वाढ झाली असून, त्याचा परिणाम म्हणून काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढच्या एक ते दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


 पुढील तीन दिवसात पूर्व भारतात तापमानात घट होणार


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून (27 एप्रिल) दिल्ली आणि परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचवेळी, पुढील एक ते दोन दिवस उत्तर-पश्चिम आणि पश्चिम भारतात कोणताही बदल दिसण्याची शक्यता नाही. बिहार, यूपी, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये यावेळी उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. पण येत्या काही दिवसात येथे हवामानात बदल दिसून येईल.


उत्तर भारतात काही ठिकाणी बर्फवृष्टी 


आज (25 एप्रिल) नवी दिल्लीत किमान तापमान 22 आणि कमाल 35 अंशांवर नोंदवले जाऊ शकते. त्याच वेळी, 26 ते 27 एप्रिल दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज  हवामान विभागानं वर्तवला आहे. 25 ते 27 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 35 ते 38 अंशांच्या दरम्यान नोंदवले जाऊ शकते. त्याच वेळी, 28 आणि 29 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. याशिवाय उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या डोंगरावरही बर्फवृष्टी झाली आहे. आजपासून केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलं आहे. मात्र, तिथं बर्फवृष्टी होत असल्यानं भाविकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. 26 एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाट पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.


महाराष्ट्रातही पावसाची शक्यता


महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस (unseasonal rain) पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा मात्र, शेती पिकांना (agricultural crops) फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळीचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मात्र या चार दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता जाणवत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, तर मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज