Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
विमानतळावर इतके पाणी साचले होते की, आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला. विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

Indira Gandhi International Airport: राजधानी दिल्लीत सुरू झालेल्या पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर पाणी तुंबलं. यावेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सकाळपासून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रावर (एनसीआर) काळे ढग दाटून आले होते. दरम्यान, दिल्लीत मुसळधार पाऊस कोसळला. हवामान विभागाने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) पावसाचा अंदाज वर्तवला होता. विमानतळावर इतके पाणी साचले होते की, आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला. विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. आगमन झालेले प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अशी परिस्थिती अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पावसासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. पावसानंतर शहराच्या काही भागांमध्ये पाणी साचले. सुब्रतो पार्कजवळही पाणी साचले आहे.
#WATCH | Delhi: Waterlogging witnessed at Indira Gandhi International Airport after heavy rainfall lashed the national capital. pic.twitter.com/vejJpM2W2l
— ANI (@ANI) September 4, 2026
गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस
गुरुग्राममध्येही मुसळधार पाऊस झाला. पावसानंतर सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. नेहमीप्रमाणे, गुरुग्राममधील रहिवाशांच्या समस्या पाणी साचल्याने आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अधिकच वाढल्या आहेत. विविध ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाने बैठका घेऊन पाणी साचणार नाही असा दावा केला होता, परंतु हे दावे फोल ठरत असल्याचे दिसत आहे. याशिवाय, दिल्लीतील नर्मदा अपार्टमेंट्समध्येही पाणी शिरले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांना प्रवासात अडचणी येत आहेत. दिल्लीत पावसाचा जोर वाढत असल्याने रस्त्यांवरील पाणी साचण्याची परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. नागरिकांना पायी रस्ता ओलांडतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिल्लीत दोन दिवसांपासून पाऊस
दिल्लीच्या काही भागांमध्ये गुरुवारी (3 सप्टेंबर) हलका पाऊस झाला, तर राजधानीत कमाल तापमान 34.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे मोसमाच्या सरासरीपेक्षा 0.8 अंशांनी जास्त होते. गेल्या 24 तासांत, सकाळी 8:30 वाजेपर्यंत, अयानगरमध्ये सर्वाधिक 3.9 मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद झाली, त्याखालोखाल पालममध्ये 3.1 मिमी आणि लोधी रोडवर 0.8 मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सफदरजंग आणि रिज येथे पाऊस झाला नाही. पालममध्ये खूपच कमी पाऊस झाला. हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून, सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवार आणि शनिवारसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















