Rahul Gandhi on Election Commission: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तब्बल एक तास 11 मिनिटे प्रेझेंटेशन करत केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनी संगनमत करून मतचोरी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी आपल्या प्रेझेंटेशनमधून केला. तुम्ही देशाशी गद्दारी करत आहात, काळ बदलेल तेव्हा तुम्हाला केलेल्या कृत्याची शिक्षा नक्की मिळेल, असा गर्भित इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. दरम्यान, काल (8 ऑगस्ट) दिलेल्या प्रेझेंटेशननंतर आजही राहुल गांधी यांनी आठ मिनिटांचा व्हिडिओ रिलीज करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालानंतरच आम्हाला मतचोरीचा संशय आल्याचे म्हटले आहे. त्यानंतरच आम्ही याबाबतीत काम सुरू केलं आणि मतचोरी समोर आणल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी अशा देशभरात 100 ठिकाणी मतचोरी झाल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 15 जागा कमी मिळाल्या असत्या, तरी मोदी पंतप्रधान झाले नसते आणि इंडिय आघाडीचे सरकार स्थापन झाले असते, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. मशीन रीडेबल मतदारयादी आयोग देत नसल्याने संशय बळावल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राची निवडणूक चोरली
राहुल यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि मतदार यादीत संशयास्पद मतदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर आमच्या शंका निश्चित झाल्या की निवडणूक चोरी झाली आहे. मशीन रीडेबल मतदार यादी न दिल्याने आम्हाला खात्री पटली की निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे. राहुल म्हणाले की आम्ही येथे मतदान चोरीचे मॉडेल सादर केले, मला वाटते की हे मॉडेल देशातील अनेक लोकसभा आणि विधानसभेत वापरले गेले. कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुलच्या आरोपांवर प्रतिज्ञापत्र मागितले आहे. त्यांनी लेखी तक्रार करावी जेणेकरून पुढील कारवाई करता येईल असे म्हटले आहे.
महाराष्ट्रात 40 लाख बनावट मतदार कुठून आले?
राहुल म्हणाले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीतील 40 लाख बनावट नावे रहस्यमय मतदार कुठून आले: महाराष्ट्रात काही महिन्यांत लाखो मतदारांची नावे यादीत जोडण्यात आली, जी खूपच चिंताजनक आहे. 40 लाख मतदार गूढ आहेत. पाच महिन्यांत येथे अनेक मतदार जोडले गेले. निवडणूक आयोगाने मतदार यादीबद्दल उत्तर द्यावे. मतदार यादी बरोबर आहे की चूक हे त्यांनी सांगावे.
संध्याकाळी पाचनंतर मतदान कसे वाढले?
सायंकाळी पाचनंतर मतदानात वाढ होणे हे देखील आश्चर्यकारक आहे. संध्याकाळी पाचनंतर मतदान का वाढले? निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यावे. काँग्रेस पक्षाने मतांच्या हेराफेरीबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत, परंतु आयोगाने एकही उत्तर दिले नाही. मतांची चोरी पकडण्यासाठी आम्हाला सहा महिने लागले.
इतर महत्वाच्या बातम्या