एक्स्प्लोर

थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

वितळवण्यात आलेल्या स्टीलचा मोठा साठा एका क्रेनच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेत असताना स्टीलचा लाव्हा खाली पडला.

हैदराबाद : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टण येथील स्टील कारखान्यात भीषण दुर्घटना (Accident) घडली असून वितळून गेलेल्या स्टीलमुळे कंपनीतील 8 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वितळवण्यात आलेल्या स्टीलचा मोठा साठा एका क्रेनच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेत असताना स्टीलचा लाव्हा खाली पडल्याने ही अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. गरम वितळलेलं स्टील कामगारांच्या (Labour) अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेनं कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना घडली असून, वितळलेल्या लोखंडाची गळती झाल्याने 8 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले आहेत. अत्यंत उच्च तापमानावर वितळलेल्या पोलादाने भरलेल्या करछुलीमध्ये (लॅडलमध्ये) झालेल्या स्फोटामुळे हा अपघात घडला. दुर्घटनेनंतर प्लांटमध्ये एकच गोंधळ उडाला, दुर्घटनेनंतर कामगार आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले होते. दरम्यान, स्टील प्लांटचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून शोक

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना घटनास्थळावरील सद्यस्थिती तसेच सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याची माहिती दिली. नायडूंनी सर्व शासकीय विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले असून, बचाव आणि मदतकार्य वेगाने व प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मदत व बचावकार्याला गती देण्याचे निर्देश

राज्याच्या गृहमंत्री वंगलापुडी अनीता यांनी विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेत सूचनाही केल्या आहेत. गृहमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या (PRO) माहितीनुसार, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे तसेच दुर्घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य वेगाने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच गृहमंत्री तातडीने दुर्घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत असून आवश्यक त्या सूचना देत आहेत.

हेही वाचा

अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
PoK Protest : ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TV Actress Struggle Life: वयाच्या 7व्या वर्षी सोडलं घर, फुटपाथवर ब्युटी प्रोडक्ट्स विकून भरलं पोट; पुढे TV ची फेव्हरेट सुनबाई बनली अन् थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी
वयाच्या 7व्या वर्षी सोडलं घर, फुटपाथवर ब्युटी प्रोडक्ट्स विकून भरलं पोट; पुढे TV ची फेव्हरेट सुनबाई बनली अन् थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
Embed widget