नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती निवळली असून दोन्ही देशांनी युद्धविरामाची माहिती दिली. मात्र, ऑपरेशन सिंदूर हे स्थगित करण्यात आलं असून दहशतवादाविरुद्ध भारताची लढाई सुरूच राहणार असल्याचे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. आता, ऑपरेशन सिंदूरवेळी भारत सरकारने घेतलेल्या भूमिका आणि भारतीय सैन्य (Indian army) दलाने दाखवलेल्या शौर्याची माहिती जगासमोर येत आहे. तसेच, ससंदीय समितीसमोर देखील देशाचे परराष्ट्र सचिव यांनी भारत-पाकिस्तान सैन्य दल कारवाईच्या संदर्भात माहिती दिली. त्यावेळी, समितीच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना पाकिस्तानने अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती का, नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानच्या कुठल्याही अणवस्त्र तळावर हल्ला केला नाही. तर, पाकिस्तानने अणवस्त्र हल्ल्याची भारताला कसलीही धमकी दिली नव्हती, असेही मिस्री यांनी सांगितले. 

Continues below advertisement

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध हे पारंपरीक म्हणजेच कन्वेन्शल युद्ध होते. त्यामध्ये, कुठल्याही अणवस्त्र युद्धाची धमकी देण्यात आली नव्हती, असे मिस्री यांनी संसदीय समितीसमोर सांगितली. पाकिस्ताने अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती का? असा प्रश्न समितीने त्यांना विचारला होता. त्यावर, उत्तर देताना मिस्री यांनी युद्धजन्य परिस्थितीतील घडामोडींवर आणि रणनीतींवर भाष्य केलं. 

पाकिस्तानने चीन शस्त्रांस्त्रांचा वापर केला का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात, सैन्य दलाच्या कारवाईत पाकिस्तानेने चीनी शस्त्रांचा वापर केला, असा प्रश्न समितीने विचारला होता. त्यावर, पाकिस्तानने जे काही हत्यारं आणि शस्त्रास्त्र वापरले त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्त्युत्तर दिले. तसेच, दहशतवादी, सैन्य दलाच्या गुप्तहेर संस्था आणि पाकिस्तान प्रशासन यांच्या मिलिभगत असल्याचेही मिस्री यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्राने घोषित केलेले दहशतवादी खुलेआम पाकिस्तानमध्ये फिरत आहेत. भारतविरुद्ध सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहेत. पहलगाम हल्ल्यातील तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या आकासोबत संपर्क केला होता. दहशतवाद्यांचा सांभाळकर्ता म्हणून पाकिस्तानचा इतिहास जगाला माहिती आहे. जे तथ्य आणि पुराव्यानिशी आहे, अशी माहितीही मिस्री यांनी दिली. 

Continues below advertisement

विरोधी पक्षाकडून सर्वपक्षीय बैठकीची मागणी

भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर विरोधी पक्षाकडून सर्वपक्षीय बैठकीची मागणी करण्यात येत आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली आहे. त्यानंतर, दोन्ही सीमारेषेवरील तणाव निवळला आहे. 

हेही वाचा

'वन नेशन, वन इलेक्शन' घेतल्यास 5 हजार कोटींचा फायदा; केंद्रीय समितीची महाराष्ट्रातील राजकीय पक्षांशी चर्चा