हरिद्वार : इंग्लिश विषयात कमी गुण मिळाल्याने एका शाळेत विद्यार्थिनींना विचित्र शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षिकेने सहावी इयत्तेत शिकणाऱ्या या मुलींचे भर वर्गात कपडे उतरवले. उत्तराखंडच्या लंढोरामध्ये एका खासगी शाळेत हा प्रकार घडला.

मुलींच्या पालकांच्या विरोधानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका महिला शिक्षिकेविरोधात भारतीय दंडविधान कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमाअंतर्गत एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

ही घटना मंगळवारची आहे. याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने सर्व जिल्ह्यातील शाळांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कोर्स सुरु केला आहे, जेणेकरुन ते विद्यार्थ्यांसोबत कशी वर्तणूक करावी, हे शिकवलं जाईल.

"दोन्ही मुलींच्या पालकांचा आरोप आहे की, इंग्लिश विषयात कमी गुण मिळाल्याने शिक्षिकेने दोघींना फटकार लगावली आणि त्यानंतर संपूर्ण वर्गासमोर त्याचं शर्ट काढलं," अशी माहिती पोलिसांनी दिली.

'आम्ही शाळा प्रशासनावरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण त्यांनी शाळेत सीसीटीव्ही लावलेले नाहीत आणि शिक्षिकेलाही निलंबीत कलेलं नाही, असं एका मुलीच्या पालकांनी सांगितलं.