एक्स्प्लोर

न्यायासाठी 43 वर्षांची कायदेशीर लढाई, 104 वर्षीय कैद्याची निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

हत्येच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 104 वर्षीय भारतीय कैद्याला 43 वर्षे कायदेशीर लढाई लढल्यानंतर निर्दोष घोषित करण्यात आलं आहे.

Justice Delayed :  हत्येच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 104 वर्षीय भारतीय कैद्याला 43 वर्षे कायदेशीर लढाई लढल्यानंतर निर्दोष घोषित करण्यात आलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील रहिवासी लखन लाल यांना वयाच्या 104 व्या वर्षी सर्व आरोपांमधून मुक्त केलं आहे. 

1977 मध्ये, खन लाल यांना सहकारी ग्रामस्थ प्रभु पासी यांच्या हत्येसाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 1982  मध्ये जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायाच्या आशेने, लखन लाल यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. लखन यांच्या निर्दोष मुक्ततेच्या बातमीने त्यांच्या कुटुंबात आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. लखन सरोज हे उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील गौरई गावात राहणारे आहेत.

नेमकं प्रकरण काय?

लखन लाल रहिवासी असलेल्या कौशांबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरई गावात 1977 मध्ये  याच गावचे रहिवासी प्रभू आणि जगन यांच्याशी वाद झाला होता. लखन लाल यांच्या म्हणण्यानुसार, 6 ऑगस्ट 1977 रोजी मृत व्यक्तीच्या बाजूचे 10 ते 12 लोक दारु पिऊन लखन यांच्या घरी आले होते. प्रत्येकाच्या हातात काठ्या होत्या. जेव्हा त्यांनी भांडायला सुरुवात केली, तेव्हा लखन यांनीही काठीचा वापर केला. या भांडणात प्रभू सरोज जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी लखन यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले होते.

लखन लाल यांच्या  कुटुंबाने त्याच्या वतीने न्याय मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालय, मुख्यमंत्री आणि कायदा मंत्री यांच्याकडे धाव घेतली होती. जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाची मदतही मागितली होती. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता, त्यांना तुरुंगातून मुक्तता मिळू शकली नाही. जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या सचिव पूर्णिमा प्रांजल आणि कायदेशीर सल्लागार अंकित मौर्य यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. अखेर मंगळवारी त्याची सुटका करण्यात आली आहे.

मोठ्या कायदेशील लढाईनंतर सुटकाझाल्यानं कुटुंब आनंदी

इतक्या मोठ्या कायदेशीर लढाईनंतर न्याय मिळाल्याबद्दल लखन लालने यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याच्या सुटकेमुळे त्याचे कुटुंब खूप आनंदी झाले. खूप दिवसांनी भेटल्यानंतर ते त्यांच्या काही नातेवाईकांना देखील ओळखू शकले नाहीत. या प्रकरणामुळे भारतीय न्यायालयांमधील खटल्यांचा प्रलंबित कालावधी आणि कायदेशीर कारवाईद्वारे दिलासा मिळविण्यासाठी लागणाऱ्या वेळेबद्दल पुन्हा एकदा चिंता निर्माण होत आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget