मुंबई : सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य, भारताच्या राजकारणाचा मेल्टिंग पॉट, सांस्कृतिक वारसा जपणारे राज्य म्हणजे उत्तरप्रदेश. असे म्हटले जाते की, दिल्लीतील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो सत्तेच्या पटावर अग्रगण्य असणारे उत्तरप्रदेश आता एक्सप्रेस वेच्या संख्येतही देशात अव्वल स्थानावर आहे. आता उत्तरप्रदेशला 'एक्सप्रेस वे कॅपिटल' ऑफ इंडिया म्हणून अशी ओळख मिळाली आहे.
उत्तरप्रदेशात सात एक्सप्रेसवे आहे. त्यामुळे या शहराला एक्सप्रेस वे कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. नोएडा-ग्रेटर नोएडा , दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे, यमुना एक्सप्रेसवे, बुंदेलखंड एक्सप्रेसवे आगरा-लखनऊ एक्सप्रेसवे, पूर्वांचल एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशात आहे. उत्तरप्रदेशातील एक्सप्रेस वे विषयी जाणून घ्या.
उत्तरप्रदेशात तब्बल 1301 किमीचे एक्सप्रेसवे आहेत. उत्तर प्रदेशात सात एक्सप्रेसवे आहेत. देशात एक्सप्रेस वे ची सर्वाधिक संख्या ही उत्तरप्रदेशात आहे. त्यानंतर हरियाणाचा क्रमांक लागतो. हरियाणामध्ये पाच एक्सप्रेसवे आहेत. महाराष्ट्रात एक एक्सप्रेस वे असून महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
बुंदेलखंड एक्सप्रेसवे
कुठून कुठेपर्यंत - चित्रकूटपासून इटावापर्यंत
लांबी किती - 296 किमी
किती जिल्ह्यांना फायदा- सात जिल्हे
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात बनला - योगी आदित्यनाथ
यमुना एक्सप्रेसवे
कुठून कुठेपर्यंत - गौतम बुद्धनगर ते आग्रा
लांबी किती - 165 किमी
किती जिल्ह्यांना फायदा- सहा जिल्हे
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात बनला - मायावती
आग्रा-लखनौ एक्सप्रेसवे
कुठून कुठेपर्यंत - आग्रा ते लखनौ
लांबी किती - 302 किमी
किती जिल्ह्यांना फायदा- दहा जिल्हे
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात बनला - अखिलेश यादव
पूर्वांचल एक्सप्रेसवे
कुठून कुठेपर्यंत - लखनौ ते गाझीपूर
लांबी किती - 341 किमी
किती जिल्ह्यांना फायदा- नऊ जिल्हे
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात बनला - योगी आदित्यनाथ
गंगा एक्सप्रेसवे
कुठून कुठेपर्यंत - मेरठ ते प्रयागराज
लांबी किती - 594 किमी
किती जिल्ह्यांना फायदा- 12 जिल्हे
कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात बनला - योगी आदित्यनाथ
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे
कुठून कुठेपर्यंत - ग्रेटर नोएडा ते बागपत
लांबी किती - 87 किमी
दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे
कुठून कुठेपर्यंत - गाझियाबाद ते मेरठ
लांबी किती - 85 किमी