नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या निकालात हरियाणातील पंचकुला येथील एकांश ढुल याने देशात तिसरा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. भाजप नेते कृष्ण ढुल यांचा मुलगा असलेल्या एकांशच्या या कामगिरीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. एकांश ढुल गेल्या अनेक वर्षांपासून UPSC परीक्षेसाठी तयारी करत होता. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला यश मिळाले असून त्यांनी देशात तिसरा क्रमांक मिळवत राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
Akansh Dhull UPSC Result: आठ वर्षांच्या मेहनतीनंतर मोठं यश
एकांशचे वडील कृष्ण ढुल यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा गेल्या आठ वर्षांपासून UPSC परीक्षेची तयारी करत होता. अत्यंत एकाग्रतेने अभ्यास करत त्याने हे यश मिळवले आहे. सातत्याने मेहनत घेतल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने सिद्ध केले असल्याचं त्यांनी सांगितले.
Akansh Dhull Previous Attempts : पहिल्या प्रयत्नात अपेक्षित यश नाही
कृष्ण ढुल यांनी सांगितले की, एकांशने पहिल्या प्रयत्नात UPSC परीक्षेत 342 वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याला 290 वा क्रमांक मिळाला. मात्र त्या वेळी त्याला IAS किंवा IPS सेवा मिळू शकली नव्हती. यानंतर त्याने अधिक मेहनत घेत तिसऱ्या प्रयत्नात देशात तिसरा क्रमांक मिळवला.
Akansh Dhull Interview Confidence : मुलाखतीच्या आत्मविश्वासाने दिले यशाचा संकेत
परीक्षा आणि मुलाखतीनंतर एकांश खूप आत्मविश्वासात असल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितले. मुलाखतीनंतर त्याने सांगितले होते की, त्याची मुलाखत खूप चांगली झाली असून तो देशातील टॉप उमेदवारांमध्ये असेल. मात्र तो थेट तिसऱ्या क्रमांकावर येईल, अशी अपेक्षा कुटुंबालाही नव्हती.
Akansh Dhull Family Support : आईच्या पाठिंब्याचे विशेष कौतुक
एकांशला या यशापर्यंत पोहोचवण्यात त्याच्या आईचा सर्वात मोठा वाटा असल्याचं कृष्ण ढुल यांनी सांगितले. आईने प्रत्येक क्षणी त्याला साथ दिली आणि आत्मविश्वास दिला. तसेच त्याचे मित्रही लहानपणापासून त्याच्या सोबत असल्याने त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोठा हातभार लागल्याचे त्यांनी सांगितले.
Akansh Dhull AIR Rank : मुख्यमंत्री नायब सैनींकडून अभिनंदन
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनीही कृष्ण ढुल यांना फोन करून एकांशच्या यशाबद्दल अभिनंदन केले. राज्यातील तरुणांसाठी एकांशचे यश प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले.
ही बातमी वाचा:
