Crime News: क्रुरतेचा कळस; आई की कैदाशीन, पोटच्या अल्पवयीन लेकीचं लग्न 45 वर्षांच्या सावत्र मुलासोबत ठरवलं, नकार देताचा करायला लावला अत्याचार अन्...
Crime News: आईने या अल्पवयीन मुलीचा तिच्याच सावत्र भावासोबत जबरदस्ती लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. ही धक्कादायक घटना बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठमध्ये नात्यांना काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी (UP Crime News) घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या सख्ख्या आईविरोधात अत्यंत गंभीर आरोप करत, तिला जबदरस्तीने कोंडून ठेवून तिच्यावर अत्याचार करायला लावल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आईने या अल्पवयीन मुलीचा तिच्याच सावत्र भावासोबत जबरदस्ती लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. ही धक्कादायक घटना बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडित मुलगी आपल्या मोठ्या बहिणीकडे पळून गेली, त्यानंतर तिने ही सर्व आपबीती तिच्या बहिणीला सांगितली. त्यानंतर दोघी बहिणी मेरठ एसएसपी कार्यालयात पोहोचल्या आणि या प्रकरणी तक्रार दाखल केली. (UP Crime News)
काय आहे प्रकरण?
पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिची आई हापुड येथील आपल्या सावत्र पतीच्या 45 वर्षीय मुलासोबत तिचा निकाह लावण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा मुलीने यास विरोध केला, तेव्हा तिच्या आईने तिला तीन दिवस एका खोलीत कोंडून ठेवलं. या दरम्यान त्या 45 वर्षीय भावाला बोलावून तिच्यावर तीन दिवसांपर्यंत अमानुष अत्याचार केला गेला. "तो व्यक्ती माझ्यावर दररोज जबरदस्ती करत राहिला आणि आई फक्त म्हणत राहिली, आता तरी निकाह कर," अशा थरकाप उडवणाऱ्या शब्दांत पीडित मुलीने आपला शारीरिक आणि मानसिक छळ मांडला. पीडित मुलगी आपल्या मोठ्या बहिणीकडे पळून गेली, त्यानंतर तिने ही सर्व आपबीती तिच्या बहिणीला सांगितली. त्यानंतर दोघी बहिणी मेरठ एसएसपी कार्यालयात पोहोचल्या आणि या फ्रकरणी तक्रार दाखल केली. (UP Crime News)
आईचा धक्कादायक भूतकाळ
पीडित मुलीच्या सांगण्यानुसार, तिची आई यापूर्वी सात वेळा निकाह करून चुकीच्या मार्गावर गेली आहे. लहान बहिणीचं लग्नही तिने एका वृद्ध पुरुषासोबत जबरदस्ती लावलं. तिच्या मोठ्या बहिणीने याच कारणामुळे कुटुंबापासून संबंध तोडले आहेत. एवढंच नव्हे, तर पीडितेचा आरोप आहे की 2006 मध्ये तिच्या आईनेच तिच्या वडिलांची हत्या केली होती. त्या प्रकरणात तिला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, आणि ती सध्या हायकोर्टाच्या जामिनावर बाहेर आली आहे.
पोलीस तपास सुरू
या अमानवी प्रकरणानंतर पीडित मुलगी आपल्या बहिणीच्या मदतीने एसएसपी कार्यालयात पोहोचली. सध्या एसपी (देहात) यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.






















