Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकची वेळ कमी करण्यात आली आहे. आता लंच ब्रेकचा वेळ हा अर्धा तास असणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मंत्रीमंडळाची बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी आणि कर्मचारी हे जेवणाचा मोठा ब्रेक घेत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे जेवणाचा वेळ कमी करण्यात आला असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.


नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?


अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लंच ब्रेक 30 मिनिटांपेक्षा जास्त नसावा. याबाबतची काळजी कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सुचना योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.  सरकारी कर्मचाऱ्यांनी दुपारी 1.30 वाजता जेवणाचा ब्रेक घ्यावा. मात्र. काही कर्मचारी दीड वाजता ब्रेक घेतल्यानंतर दुपारी 3.30 किंवा 4 च्या सुमारास कामाला सुरुवात करतात. तर काही वरिष्ठ अधिकारी दुपारच्या जेवणासाठी घरी जातात, ते देखील तीन तासांचा ब्रेक घेतात. त्यामुळे जेवणाची वेळ कमी करण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे


दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे अधिकाऱ्यांच्या संबंधी कठोर पावले उचलत असल्याचे दिसत आहे. अलीकडे उत्तर प्रदेशात सातत्याने अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या आहेत. दुसरीकडे, ओरैयाचे डीएम सुनील वर्मा यांना योगी सरकारने निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे योगी यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर भुमिका घेतली आहे. 


दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी आता जेवणाची वेळ कमी केल्यामुळे कर्मचारी नेमकं काय म्हणतात हे देखील पाहणं गरजेचे आहे. मात्र, या निर्णयामुळे योगी सरकारची सरकारी अधिकाऱ्यांवर करडी नजत आहे हे मात्र निश्चित. त्यामुळे यापुढे आता कर्मचाऱ्यांना वेळेतच जेवण करुन काम करावं लागणार आहे, अन्यथा कारवाई होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: