Rajesh Mishra : उत्तर प्रदेशमध्ये (UP) 10 आणि 12 वी च्या  बोर्डाच्या परीक्षांचा निकाल (UP Board Result 2023) जाहीर झाला आहे. यामध्ये 55 वर्षीय भाजपचे बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपुर  विधानसभेचे (Bithri Chainpur Vidhansabha) माजी आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल (Rajesh Mishra) हे 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीसह ते उत्तीर्ण झाले आहेत. बरेली येथील हायस्कूलचा निकाल 87.95 टक्के लागला आहे. तर 12 वी च्या परीक्षेचा निकाल हा 73.84 टक्के लागला आहे.


राजेश मिश्रा यांच्या समर्थकांचा जल्लोष 


राजेश मिश्रा (Rajesh Mishra)  यांना तीन विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळं मी खूप आनंदी झाल्याची माहिती राजेश मिश्रा यांनी दिली. दरम्यान, राजेश मिश्रा हे उत्तर प्रदेशच्या परीक्षा बोर्डाकडून उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याची मागणी करणार आहेत. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजेश मिश्रा यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यालयात मिठाई वाटून आनंद साजरा केला. आमदार मिश्रा उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळताच परिसरात समर्थकांनी जल्लोष केला. त्यांच्या समर्थकांनी भाजप आमदाराला मिठाई देऊन त्यांचे अभिनंदन केले. 


शिकण्याला वय नसते 


राजेश मिश्रा यांच्या वयातील लोक आराम करणे पसंत करतात. मात्र, मिश्रा यांना या वयातही मेहनत करुन 12 वी ची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले. अभ्यास करण्याला किंवा शिकण्याला कोणतेही वय नसते. शिकण्याचे आणि अभ्यासाचे वय नसते हे राजेश मिश्रा यांनी सिद्ध केले आहे. शिकण्याची जिद्द असेल तर कधीही शिकता येते आणि अभ्यास करता येतो, असं मिश्रा यांच्या एका समर्थकाने सांगितले.


वकील बनून लोकांची सेवा करणार


राजेश मिश्रा यांचे वकिली करण्याचे स्वप्न आहे. आता ते पुढचे पदवीचे शिक्षण घेणार आहेत. त्यानंतर एलएलबी करणार असल्याची माहिती  राजेश मिश्रा यांनी दिली. वकील बनून ते पैसे भरण्यास असमर्थ असलेल्या परिसरातील गरीब लोकांना मदत करणार आहेत. अभ्यास आणि राजकारणाला कोणतेही वय नसते असंही मिश्रा यावेळी म्हणाले. भाजप नेते राजेश मिश्रा उर्फ ​​पप्पू भरतौल हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर बिथरी चैनपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Mumbai University :एलएलबीची सहाव्या सत्राची परीक्षा तोंडावर तरी परीक्षेचे अर्ज भरून घेतले नाहीत, मुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार कायम