Sankeshwar: शारीरिक त्रासापेक्षा कित्येक पटींनी मानसिक नैराश्य फार मोठा आघात करणारा ठरतो, हे अनेकदा समोर आलं आहे. कर्नाटकातील संकेश्वर जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय.  वय उलटून गेल्याने लग्न न झाल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या भावांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात समोर आली आहे. शनिवारी (31 मे) ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यू झालेल्या भावांची नावं संतोष रवींद्र गुंडे (55) आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे (50) अशी आहेत. 

लग्न न जमल्यामुळे नैराश्य, शेवटी टोकाचं पाऊल

विवाह ठरत नाही, वय उलटून गेलं, या नैराश्यातून दोन सख्ख्या अविवाहित भावांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात समोर आली आहे. शनिवारी या दोघांनी विष प्राशन करून आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याने नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोननकेरी गावात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिकांनी या भावांच्या मानसिक अवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली आहे.वय वाढत गेलं तरी विवाह जुळत नसल्याच्या नैराश्यात ते दोघंही गेल्या काही काळापासून होते.

या मानसिक तणावातूनच त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.आत्महत्येविषयी कळताच त्यांच्या नातेवाइकांना याची माहिती मिळताच दोघांनाही तातडीने वाहनातून गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले.  या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दोघेही कुटुंबासोबत राहत होते की एकटे याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, या आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा:

संतापजनक! माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधलं, शरिरावर चटके देत अमानुष छळ, निर्दयी मारहाणीतून.. छत्रपती संभाजीनगर हादरले