Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan) यांना हाजीपूरमधून लोकसभा सदस्यत्व देण्याबाबत आव्हान देण्यात आले आहे. बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणाची माहिती लपवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पाटणा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. हाजीपूरमधून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी तिन्ही ठिकाणी अपील करण्यात आले आहे. अशी माहिती भाजप नेते राकेश सिंह यांनी दिली.


चिराग पासवान यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात खगरियाच्या शाहरबन्नी येथील वडिलोपार्जित संपत्तीची योग्य माहिती दिली नाही, असाही आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोग, हाजीपूरचे डीएम आणि रिटर्निंग ऑफिसर यांना प्रतिवादी केले आहे. चिराग पासवान यांच्या विरोधात आघाडी उघडणारे राकेश सिंह हे अनेक दिवसांपासून भाजपशी संबंधित आहेत. पण, 2020 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ते एलजेपीच्या तिकिटावर जेहानाबादच्या घोशी येथून उमेदवार होते. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.


दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात चिराग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


भाजप नेते राकेश सिंह यांनी दावा केला की, 'चिराग दलितांवर अन्याय करत आहेत. दलितांच्या नावाने मलई खात आहेत. त्यांचे प्रतिज्ञापत्र आम्ही वाचले आहे. त्याचा आढावा घेतला, तेव्हा कळले की दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात चिरागवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पहिला आरोपी त्याचा चुलत भाऊ आणि राष्ट्रीय लोजप नेता आणि माजी खासदार राजकुमार राज आहे. तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी चिराग पासवान आहे. ही बाब 2021 सालची आहे. या प्रकरणाची कोणतीही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. 


2021 मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवण्यात आला 


चिराग पासवान यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखवत राकेश सिंह म्हणतात की, 'बलात्कार हा एक जघन्य गुन्हा आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी 2021 मध्ये तेथे एफआयआर नोंदवला होता. ही माहिती त्यांनी लेखी देण्याऐवजी लपवून ठेवली आहे. राकेश म्हणाले की, 'चिराग यांना स्वत:चं अस्तित्व नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणुका जिंकल्या आहेत आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते त्यांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाला आव्हान दिले आहे. 


पदवीलाही बनावट म्हटले


राकेश सिंह यांनी चिराग यांच्या बी.टेक डिग्रीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. असेही 2005 मध्ये ते झाशीच्या बुंदेलखंड विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमधून बी.टेक शिकत होते. त्यातही दोष आहे. झाशीत एक दिवसही ते कुणाला दिसले नाहीत. कॉलेजच्या रजिस्टरमध्ये एक दिवसही त्यांची हजेरी लागलेली नाही. त्यांनी बनावट पदवी घेतली आहे. 


दबावाचे राजकारण सहन होत नव्हते


चिराग दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यांवरून हल्लाबोल करताना आम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि घटनापीठाच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. सरकार जे काही करायचे ते करेल. पण, त्या निमित्ताने त्यांनी दबावाचे राजकारण केले. केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. झारखंड आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी भाजपवर दलितविरोधी असल्याचा दबाव आणण्यास सुरुवात केली.


इतर महत्वाच्या बातम्या