एक्स्प्लोर

Vande Mataram: 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड

Vande Mataram: या कायद्यांतर्गत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि भारतीय राज्यघटनेचा अवमान केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, तीच आता राष्ट्रीय गीतालाही लागू होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचा अवमान करणे हा गुन्हा ठरवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. 'प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971' (The Prevention of Insults To National Honour Act, 1971) या कायद्यात सुधारणा करून त्यात 'वंदे मातरम्'चा समावेश करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने काल (5 मे) रोजी मान्यता दिली आहे.

अवमान केल्यास शिक्षा

या सुधारणेमुळे 'वंदे मातरम्' गाताना अडथळा आणणे किंवा त्याचा अपमान करणे हा आता दंडनीय गुन्हा ठरेल. सध्या या कायद्यांतर्गत राष्ट्रगीत (जन गण मन), राष्ट्रध्वज आणि भारतीय राज्यघटनेचा अवमान केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, तीच आता राष्ट्रीय गीतालाही लागू होईल.

MHA च्या मार्गदर्शक सूचना

6 फेब्रुवारी रोजी गृह मंत्रालयाने (MHA) दिलेल्या सूचनांनुसार, अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् मधील सर्व सहा कडवी (साधारण 3 मिनिटे वेळ) गायली किंवा वाजवली जावीत. तसेच, ज्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही वाजवले जाणार असतील, तिथे राष्ट्रीय गीताला (वंदे मातरम्) प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. यापूर्वी गृह मंत्रालयाच्या वंदे मातरम् संदर्भातील सूचना केवळ सल्लागार (Advisory) स्वरूपाच्या होत्या. आता कायद्यात सुधारणा केल्यामुळे त्यांना कायदेशीर किंवा वैधानिक (Statutory) पाठबळ प्राप्त होणार आहे.
 
'वंदे मातरम्' हे बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिले असून 1880 च्या दशकात त्यांच्या 'आनंदमठ' कादंबरीत ते प्रसिद्ध झाले होते. 1937 मध्ये काँग्रेसने याच्या पहिल्या दोन कडव्यांचा स्वीकार केला होता आणि नंतर भारतीय राज्यघटनेने याला 'राष्ट्रीय गीता'चा (National Song) दर्जा दिला.
 
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदावरुन हटवा, राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
Embed widget