एक्स्प्लोर

Ujjain : दारुबंदीनंतर उज्जैनमधील नियम बदलले! महाकालचा सेनापती काळभैरवला भोग म्हणून दारू कशी अर्पण करणार? भाविकांसाठी 'हा' नियम लागू

Ujjain Temple Kaal Bhairav Liquor Ban : उज्जैनच्या महाकालचे दर्शन घेण्यापूर्वी सेनापती काळभैरवाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. काळभैरवाला दारूचा भोग चढवण्याचाही प्रघात आहे. 

मुंबई : महाराष्ट्रातून मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकालचे दर्शन घेणाऱ्यांच्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अगदी गावागावातून महाकालचे दर्शन घेण्यासाठी युवकांचे जथ्थे उज्जैनला नेहमीच जातात. महाकालबाबाचे दर्शन घेण्यापूर्वी  सेनापती काळभैरवचे दर्शन घेऊन त्याला दारूचा भोग चढवण्याची परंपरा आहे. पण उज्जैनमध्ये दारूबंदीच्या निर्णयामुळे भाविकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. भाविकांना उज्जैनमध्ये दारू मिळणार नाही. पण त्यासाठी सरकारने काही गोष्टींमध्ये सवलत दिली आहे. सरकारच्या नव्या नियमांचे पालन केल्यास भाविकांना काळभैरवला दारूचा भोग चढवता येऊ शकतो.

मध्य प्रदेशमध्ये 1 एप्रिलपासून 17 धार्मिक ठिकाणी दारुबंदीचा नियम लागू करण्यात आला आहे.  त्यामध्ये उज्जैनचा समावेश आहे. उज्जैनच्या सीमेमध्ये दारूची विक्री करता येणार नाही. काळभैरव हे मंदिर उज्जैनच्या सीमेमध्येच येत असल्याने मंदिराच्या आवारात असलेली दारूची दुकानंही बंद करण्यात आली आहेत. असं असलं तरी सरकारने बाहेरुन दारू आणून काळभैरवला भोग चढवण्यास मान्यता दिली आहे. 

काळभैरवसाठी दारू बाहेरून आणता येणार

उज्जैनमध्ये जरी दारुबंदी असली तरी काळभैरवाला भोग चढवण्यासाठी मात्र भाविकांना बाहेरून दारू आणता येणार आहे. पण ही दारू आणण्याचं प्रमाण मर्यादित करण्यात आलं आहे. 

उज्जैन शहरामध्ये लागू करण्यात आलेल्या दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उज्जैनमध्ये येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी पहारा ठेवला असून प्रत्येकाची तपासणी केल्याशिवाय सोडलं जात नाही. 

पोलिस प्रामुख्याने इंदूर-उज्जैन, देवास-उज्जैन, बडनगर-उज्जैन, माकसी-उज्जैन आणि आगर-उज्जैन या मार्गांवर वाहनांची तपासणी करत आहेत. ग्रामीण भागातील पोलिसांनाही त्याबाबत सतर्क करण्यात आले आहे.

काळभैरवला दारुचा भोग का चढवला जातो? 

काळभैरव मंदिरात दारू अर्पण करण्यामागे अनेक प्रकारच्या श्रद्धा आहेत. राजा विक्रमादित्यच्या काळात याची सुरुवात झाल्याचं मानलं जातंय. तसेच काळभैरव हा शाक्त पंथियांचा देव असल्याचंही मानलं जातं. त्यामुळेच काळभैरवाला दारुचा भोग चढवण्याचा प्रघात आहे. 

काळभैरव मंदिरात भोग म्हणून दारू अर्पण करण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ही दारू मूर्तीच्या समोरच्या पात्रात टाकली जाते. अनेकांचा दावा आहे की पात्रात दारू टाकल्यानंतर ते पात्र रिकामं होतं.  त्यामुळे ही दारू कुठे जाते याचं कोडं आजतागायत उलगडू शकलेले नाही. काळभैरवाची मूर्तीकडून या दारुचं सेवन केलं जातं असा लोकांचा दावा आहे.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच
Pune Crime News : चोरट्यांनी चक्क 'Virtual Court' भरवलं! पुण्यात निवृत्त वृद्धाची १० कोटींची फसवणूक
Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : गाढवाला गुळाची चव काय? रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम
Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?
खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget