दिल्लीत शेतकऱ्यांच्या मार्गात खिळं ठोकणाऱ्या, भिंती उभ्या करणाऱ्या मोदींना आताच आठवण का आली? देशात अघोषित सीएए-एनआरसी लागू झालं आहे का? यांचा बुरखा दिवसागणिक फाटू लागला; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray on PM Modi: शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकणाऱ्या मोदींना आताच शेतकऱ्यांचा पुळका का आला? यांचा बुरखा दररोज फाटत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray on PM Modi: डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या ट्रम्प टॅरिफचा फटका सामान्यांना बसणार असून ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना अवाक्षरानेही उत्तर देत नाही. देशाचं सरकार नेमकं चालवतंय कोण? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी किंमत मोजण्यासाठी तयार असल्याच्या मोदींच्या वक्तव्याचा सुद्धा समाचार घेतला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकणाऱ्या मोदींना आताच शेतकऱ्यांचा पुळका का आला? यांचा बुरखा दररोज फाटत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांची गरज
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांची गरज आहे. आत्ताचे पंतप्रधान हे भाजपचे आहेत. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरही मोदी बिहारला गेले, पहलगामला गेले नाहीत. या सरकारकडे परराष्ट्र नीती वगैरे काही नाही, परराष्ट्र धोरणात सरकार अपयश ठरलं असून खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारत असताना डोवाल रशियाला गेले. पंतप्रधान चीनला चालले आहेत. चीन बरोबर संबंधही त्यांच्या मित्रासाठी दरवाजे उघडतात का? पाहत असावेत.
देशात अघोषित एनआरसी लागू झालं का?
ठाकरे पुढे म्हणाले की, बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ झाला आहे. त्याबाबतचा निर्णय आला की नाही याची कल्पना नाही. मात्र स्वत:ची ओळख मतदारांनी पटवून द्यायची. म्हणजेच याचा अर्थ असा की, देशात अघोषित एनआरसी लागू झालं का? देशात जेव्हा सीएए आणि एनआरसी विषय गाजला होता. दिल्लीत त्याच्यावरून रान पेटलं होतं. साधारण त्यावेळी विषय हाच होता, तुम्ही तुमची ओळख पटवून द्या. त्यामुळे देशाता आता एनआरसी लागू झाला आहे का? याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मला मोठी किंमत मोजावी लागेल, पण मी तयार
दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी आज (6 ऑगस्ट)) अमेरिकन टॅरिफचा उल्लेख न करता सांगितले की आपल्या शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च आहे. भारताने आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड केलेली नाही. मोदी यांनी आज दिल्लीतील स्वामीनाथन शताब्दी परिषदेत म्हटले की, 'मला आपोआप समजले की मला मोठी किंमत मोजावी लागेल, पण मी तयार आहे.' अमेरिका आपल्या भूमिकेसह भारताच्या कृषी आणि दुग्ध क्षेत्रात प्रवेश करू इच्छित आहे. अनेक भेटी आणि बैठकींनंतर, भारत तयार नाही. आजपासून, म्हणजे 7 ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेत विक्री होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादला जाईल. तर 25 टक्के अतिरिक्त सूट 27 ऑगस्टपासून लागू होईल. सामान्य भारतीय वस्तूंना अमेरिकन बाजारात मागणी आहे. टॅरिफने किंमत वाढल्यास त्यांची मागणी कमी होऊ शकते. त्यामुळे ग्राहक इतर देशांमधून वस्तू मागवू शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या























