Turkey Support for Pakistan: भारत पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी (India-Pakistan Ceasefire) करण्याचा निर्णय झाला असला तरी या दोन्ही देशांमधील वाद अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर जगभरात गाजलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Opration Sindhoor) पाकिस्तान पुरता घाबरला आहे. दरम्यानच्या काळात त्याने भारतावर अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेपुढं त्याचं काहीही चाललं नाही. भारतीय सैन्याने हा प्रत्येक हल्ला हाणून पाडला. अशातच दहशतवादाच्या विरोधातील या लढ्यात अनेक देशांनी भारताची साथ दिली असताना, काही देश पाकिस्तानच्या बाजूने आहे. यात तुर्कीनेही (Turkey) भारताविरुद्ध आवाज उठवला आहे. शिवाय त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला. तसेच या तणावादरम्यान तुर्कीने भारतावर हल्ले करण्यासाठी ड्रोन देखील पुरवल्याची माहिती आली होती. मात्र आता आणखी एक खळबळजनक माहिती हाती लागली आहे. तुर्कीने पाकिस्तानला फक्त शस्त्रे दिली नाही, तर ती शस्त्रे चालवण्यासाठी सैनिकही पाकिस्तानात पाठवले होते. भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या सैन्यासोबत तुर्कीचे देखील सैन्य उपस्थित होते. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन तुर्की सैनिकही मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
2023 मध्ये भारत तुर्कीचा मदतीला धावला होता-
भारताविरुद्ध तुर्कीने पाकिस्तानला 350 हून अधिक ड्रोन पुरवले होते. ज्यासाठी ड्रोन ऑपरेटरनाही पाकिस्तानला मदत करण्यासाठी पाठवण्यात आले होते. 2023 मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या एका मोठ्या भूकंपात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्त सुरू केले होते आणि तुर्कीसाठी मदतीचा खजिना उघडला होता. आज तोच तुर्की भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत करत आहे.
तुर्कीविरोधात भारताचं आक्रमक पाऊल-
भारत आणि पाकिस्तानच्या तणावावेळी पाकिस्तानला सक्रिय पाठिंबा देणं तुर्की आणि अझरबैजानला भोवण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशात जाणाऱ्या 60 टक्के भारतीय पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केली आहेत. तर दुसरीकडे मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये तुर्की आणि अझरबैजानमधून येणाऱ्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात आहे. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अजरबैजानला जाणाऱ्या 60 टक्के पर्यटकांनी आपले नियोजित बुकिंग रद्द केल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजेंट असोसिएशन ऑफ इंडियाने दिली.
