एक्स्प्लोर

Turkey India Relations : ज्या देशाने पाकिस्तानला साथ दिली, 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात ड्रोन पुरवले, त्या देशाचा भारतासाठी नवा प्लॅन तयार

Turkey India Diplomatic Relations: काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानला सातत्याने साथ देणाऱ्या तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकन फिदान यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Turkey India SCO News : भारताशी नेहमीच पंगा घेणारा आणि काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानची उघड साथ देणारा तुर्की आता अचानक भारताशी संबंध सुधारण्यासाठी उत्सुक दिसत आहे. तुर्की आता 'शांघाय सहकार्य संघटनेचे' (SCO) पूर्णवेळ सदस्य बनण्याच्या तयारीत असून, तसे झाल्यास या गटात समाविष्ट होणारा तो पहिला नाटो (NATO) देश ठरेल.

या पार्श्वभूमीवर तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकन फिदान यांनी भारताशी संबंध मजबूत करण्यावर भर दिला आहे. "भारतासोबत आमची कोणतीही सीमा किंवा थेट द्विपक्षीय वाद नाहीत, त्यामुळे दोन्ही देशांनी सकारात्मक अजेंड्यासह पुढे जायला हवे," असे वक्तव्य फिदान यांनी केले आहे.

Turkey Hakan Fidan On India : पाकिस्तानसोबत मैत्री असली तरी भारताशी वैर नाही

तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "रशिया, अमेरिका किंवा युरोपीय देशांशी आमचे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण आम्ही नकारात्मक बाबी बाजूला ठेवून काम करतो. भारत आणि तुर्कीनेही हेच करायला हवे, कारण आपल्यात सहकार्यासाठी खूप मोठी संधी आहे."

पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवर बोलताना फिदान म्हणाले, "तुर्कीचे केवळ पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत असे नाही, तर त्यामध्ये इतरही अनेक देश आहेत. द्विपक्षीय पातळीवर भारताशी आमची कोणतीही समस्या नाही आणि भारताने याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू नये."

Turkey India Trade : आर्थिक टंचाई आणि भारतीय पर्यटकांचा आधार

तुर्कीला सध्या भारतातील व्यापार आणि गुंतवणुकीत मोठा रस आहे. तुर्कीच्या अर्थव्यवस्थेत भारतीय पर्यटकांचे योगदान खूप मोठे आहे. तुर्की भारताला मार्बल, मशिनरी आणि कृषी उत्पादने निर्यात करतो, तर भारत तुर्कीला केमिकल्स, ऑटोमोबाईल्स आणि यंत्रसामग्री पाठवतो. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि व्यापाराला गती देण्यासाठी तुर्कीला भारताची मोठी साथ हवी आहे.

Turkey Pakistan Kashmir Policy : काश्मीर मुद्दा अन् पाकिस्तानला दिलेली साथ

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या लष्करी कारवाईला तुर्कीने विरोध केला होता. इतकेच नाही तर तुर्कीत तयार झालेले ड्रोन पाकिस्तानने भारताच्या विरोधात वापरले होते. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी सातत्याने संयुक्त राष्ट्रात (UN) काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानची तळी उचलून धरली होती. या कारणांमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले होते.

India Turkey Extradition Talk : चार वर्षांनंतर परराष्ट्र स्तरावर संवाद सुरू

दीर्घकाळ राहिलेल्या तणावानंतर एप्रिल 2026 मध्ये भारत आणि तुर्की दरम्यान चार वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा परराष्ट्र कार्यालय स्तरावर (Foreign Office Consultation) चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला याच्या प्रत्यर्पणात तुर्कीने भारताला मोठी मदत केली होती. सध्या दोन्ही देशांमध्ये इतरही गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहिल्या अन् अचानक जोरदार घोषणाबाजी; नंतर चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्..., नेमकं काय घडलं?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहिल्या अन् अचानक जोरदार घोषणाबाजी; नंतर चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्..., नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Embed widget