ट्रकने मागून धडक देताच मिनी ट्रॅव्हलर थेट नदीत कोसळली; 8 जखमी, 9 जण अजूनही बेपत्ता, 3 जणांचा मृत्यू; महाराष्ट्रासह चार राज्यातील प्रवाशांचा समावेश
ट्रॅव्हलरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रवासी बसले होते. ट्रॅव्हलरमधील 20 जणांची नावे आणि पत्ते जाहीर करण्यात आले आहेत.

Traveler falls into Alaknanda river: उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये ट्रकने मागून धडक दिल्यानंतर ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत पडला. घोलथिर येथील बद्रीनाथ महामार्गावर हा अपघात झाला. ट्रॅव्हलरमध्ये 20 जण होते, त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण जखमी आहेत. त्याच वेळी, 9 जण अजूनही बेपत्ता आहेत. ट्रॅव्हलरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रवासी बसले होते. ट्रॅव्हलरमधील 20 जणांची नावे आणि पत्ते जाहीर करण्यात आले आहेत. मृतांपैकी 2 जणांची ओळख पटली आहे, ते मध्यप्रदेशातील राजगड येथील रहिवासी विशाल सोनी (42), आणि गुजरातमधील आयमाता चौक सुरत येथील रहिवासी द्रिमी (17), अशी आहे.
चालक सुमितने सांगितले की, तो प्रवाशांना केदारनाथ दाखवून बद्रीनाथ धामला घेऊन जात होता. दरम्यान, रुद्रप्रयागमधील घोलथिरजवळ मागून एका ट्रकने ट्रॅव्हलरला धडक दिली. त्यामुळे मिनी ट्रॅव्हलर अलकनंदात पडला. सुमित हा हरिद्वारचा रहिवासी आहे. त्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुद्रप्रयाग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
40 किमीपर्यंत बचावकार्य सुरू
एसडीआरएफचे जवान रुद्रप्रयाग बस अपघातस्थळापासून 40 किमी अंतरावर असलेल्या गढवाल येथील श्रीनगर येथील धरणाजवळ शोध मोहीम राबवत आहेत. जेणेकरून, जोरदार प्रवाहामुळे नदीत वाहून गेलेल्या बस प्रवाशांचा शोध घेता येईल. उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन म्हणाले की, आम्हाला 8 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे.
राजस्थानहून एक पथक चार धाम यात्रेसाठी आले होते
ट्रकला झालेल्या धडकेमुळे काही लोक ट्रॅव्हलरमधून बाहेर फेकले गेले आणि टेकडीवर लटकले, ज्यांना वाचवण्यात आले. इतर लोकांचाही शोध सुरू आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफसह स्थानिक पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. राजस्थानहून एक पथक बद्रीनाथला भेट देण्यासाठी चार धाम यात्रेवर आले होते, हे सर्व प्रवासी राजस्थानचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धाम यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी X वर लिहिले आहे की, रुद्रप्रयागमध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडल्याची बातमी दुःखद आहे. SDRF आणि इतर बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य केले जात आहे. मी या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करतो.
इतर महत्वाच्या बातम्या


















