Tirupati Venkateswara Temple Darshan : आंध्र प्रदेशातील तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून लोक येतात.तिरुमला पर्वतावर बांधलेल्या या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना गर्दीमुळे लांबच लांब रांगेत अनेक तास उभे राहावे लागते. भाविकांना झटपट दर्शन करता यावे यासाठी  तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) एप्रिलपासून मंदिराच्या दर्शनासाठी विशेष तिकिटे जारी केली आहेत.


मंदिराला भेट देऊ इच्छिणारे भाविक मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात. विशेष प्रवेश तिकिटांची किंमत प्रति व्यक्ती 300 रुपये आहे. दर्शनासोबतच एखाद्या व्यक्तीची इच्छा असल्यास तो मंदिर परिसरात मुक्कामही बुक करू शकतो.


>> अशा प्रकारे बुक करा स्पेशल तिकीट 


मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर बुकिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोन नंबरसह लॉग इन करावे लागेल आणि फोन नंबरवर पाठवलेला ओटीपी नमूज  करावा लागेल. त्याच वेळी, द


'न्यू इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिरुमला मंदिराच्या 2.25 लाख विशेष प्रवेश तिकीटांची विक्री झाली होती. 23 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसीय वैकुंठ द्वार दर्शनासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कडून तिकिटे जारी करण्यात आली होती. 


>> तिकीटांसाठी 9 केंद्रे तयार


गेल्या वेळी वैकुंठद्वार दर्शनासाठी व्यंकटेश्वर मंदिरात आलेल्या 80,000 भाविकांसाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली होती. 'ई टीव्ही भारत'ने आपल्या वृत्तात म्हटले की, टीटीडी अधिकाऱ्यांनी तिरुपतीमधील नऊ केंद्रांची तिकिटे काढण्यासाठी व्यवस्था केली आणि सुमारे 25,000 लोकांना विशेष प्रवेशद्वारांद्वारे 'दर्शन' करण्याची परवानगी देण्यात आली.


कल्याणोत्सव, अरिजित ब्रह्मोत्सव, उंजल सेवा आणि सहस्र दीपलंकारची तिकिटे 22 जानेवारी रोजी मंदिराच्या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली आहेत. शिवश्रीच्या वार्षिक वसंत उत्सवाची तिकिटे एप्रिलमध्ये पोर्टलवर प्रसिद्ध केली जातील. 21 ते 23 एप्रिल दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


तिरुपती मंदिर हे जगातील श्रीमंत देवस्थानापैकी आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय द्राविडी शैली वास्तुकलेचे आणि कलाकुसरचे अप्रतिम उदाहरण आहे. तिरुपती मंदिर हे जगातील श्रीमंत देवस्थानापैकी आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय द्राविडी शैली वास्तुकलेचे आणि कलाकुसरचे अप्रतिम उदाहरण आहे.बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो.