Success story :  अलकिडच्या काळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसत आहे. या परीक्षांमधून अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. पण अधिकारी होणे वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही. कारण दिवसेंदिवस या क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेच्या काळात तुम्हाला टिकून राहायला असेल तर जिद्द, चिकाटी, सातत्य आणि मेहनत करावी लागते. आज आपण अशाच एका युवकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या युवकाला तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश आले तरीदेखील तो खचला नाही. त्याने अधिकरी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. जाणून घेऊयात त्याची यशोगाथा.

Continues below advertisement

वित्त विभागाच्या सहायक संचालक पदावर कार्यरत

आज आपण मध्य प्रदेशातील नर्मदापुरमचे रहिवासी असलेल्या मनोज पाल यांची यशोगाथा पाहणार आहोत. त्यांनी  वर्षांच्या संघर्षानंतर आणि 40 वेळा अपयशी ठरल्यानंतर यश मिळवलं आहे. सध्या मनोज पाल हे सध्या वित्त विभागाच्या सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षा 2024 मध्ये त्यांनी हे यश मिळवलं आहे. बारावीत केवळ 50 टक्के गुण मिळवून आणि कोविड-19 महामारीच्या काळात मजूर म्हणून काम करूनही, त्यांनी कधीही हार मानली नाही आणि आपल्या समर्पणाने एक आदर्श निर्माण केला आहे. 

12 वी मध्ये फक्त 50 टक्के गुण मिळाले

मनोज पालचे यश हे अनेक वर्षांचा संघर्ष, आर्थिक अडचणी आणि वारंवार अपयश येऊनही स्वतःवरील अढळ विश्वासाचा परिणाम आहे. मनोज पालचे सुरुवातीचे शिक्षण त्याच्या गावात झाले. त्याने तेथेच 12 वी पूर्ण केली आणि जवळपास 50 टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली. मर्यादित उत्पन्न असलेल्या कुटुंबातून आल्यामुळे मनोजसाठी पुढील शिक्षण घेणे कठीण होते. असे असूनही, त्याने हार मानली नाही आणि महाविद्यालयीन शिक्षण सुरू करण्यासाठी तो नर्मदापुरम येथे गेला. अभ्यासासोबतच, तो मुलांना शिकवून आपल्या गरजांसाठी पैसे जमवत असे आणि स्पर्धा परीक्षांची तयारीही करत असे. मनोजने दिलेल्या माहितीनुसार, माझा मेहनतीवर नेहमीच विश्वास होता. जर तुम्ही मेहनत केली असेल, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. त्याच्या अंतिम निवडीची बातमी कुटुंबासाठी भावनिक होती

Continues below advertisement

कोरोना महामारीच्या काळात मजूर म्हणून काम केलं

मनोजच्या संघर्षाचा सर्वात कठीण काळ कोविड-19 महामारीचा काळ. या महामारीमुळे त्याचे काम आणि उत्पन्न विस्कळीत झाले आणि त्याने आपले सर्वस्व गमावले. आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणे अवघड झाले. या काळात, मनोज आपल्या गावी परतला आणि पैसे उभे करण्यासाठी मजूर म्हणून काम करू लागला. त्यानंतर तो इंदूरला गेला आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. तिथे, आपल्या अभ्यासासाठी निधी मिळावा म्हणून तो मुलांना शिकवणी देऊ लागला आणि एका कोचिंग सेंटरमध्ये कामही करू लागला.

जवळपास 40 परीक्षांमध्ये अपयश आलं 

दरम्यान, मनोजने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश आले होते. मात्र, मी खचून जाता अभ्यास सुरुच ठेवला. यामध्ये विविध भरती परीक्षांचा समावेश होता. त्याने पोलीस कॉन्स्टेबल, वनरक्षक, पटवारी, ऑडिटर आणि संचालक पदांसाठी परीक्षा दिल्या. त्याने कर्मचारी निवड आयोगाच्या मल्टी-टास्किंग स्टाफ, संयुक्त उच्च माध्यमिक आणि संयुक्त पदवी स्तर परीक्षाही दिल्या. त्याने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा, कुलसचिव आणि सहाय्यक प्राध्यापक परीक्षांसह इतर परीक्षांमध्येही आपले नशीब आजमावले. तो अनेक परीक्षांमध्ये अव्वल स्थानी पोहोचला, पण अंतिम निवड मिळवण्यात अपयशी ठरला.

एमपीपीएससी परीक्षेचे नऊ प्रयत्न, सात वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचला पण

मनोजने एमपीपीएससी परीक्षेचा नऊ वेळा प्रयत्न केला. या नऊ प्रयत्नांमध्ये, तो नऊ वेळा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाला. तो आठ वेळा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला, मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आणि सात वेळा मुलाखतीला हजर राहिला. असे असूनही, त्याला अंतिम निवड मिळवता आली नाही. सातत्याने निराशाजनक निकाल लागत असूनही, मनोजने तयारी सुरूच ठेवली. अखेरीस, त्याची राज्य सेवा परीक्षा २०२४ मध्ये निवड झाली आणि त्याच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले.

मनोज शेतकरी कुटुंबातील, आर्थिक परिस्थिती बेताची

मनोज शेतकरी कुटुंबातील आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याच्या तयारीदरम्यान त्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला, परंतु दीर्घकाळ बेरोजगार राहिल्यामुळे त्याचे कुटुंब अधिकाधिक चिंतीत झाले. मनोज सांगतो की, त्याचे वय वाढत असल्यामुळे आणि बहिणींची लग्ने करायची असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना काळजी वाटत होती, म्हणून त्याने काही काम करून पैसे कमवायला सुरुवात करावी. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने एखादे छोटे काम सुरू करावे, अशी कुटुंबाची इच्छा होती.

6 ते 8 तास अभ्यास, सराव परीक्षा आणि आत्मपरीक्षण

मनोजची तयारीची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध होती. तो सकाळी 6 वाजता उठून ग्रंथालयात जायचा. जेवण्यासाठी परत यायचा आणि मग पुन्हा ग्रंथालयात जायचा. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत ग्रंथालयात अभ्यास केल्यानंतर, तो सकाळी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोचिंग क्लासमध्ये जायचा. तो दररोज अंदाजे 6 ते 8 तास अभ्यास करायचा. त्याच्या तयारीदरम्यान, त्याने असंख्य सराव परीक्षा दिल्या, आपल्या चुकांचे आत्मपरीक्षण केले आणि मित्रांसोबत विषयांवर चर्चा केली. त्याने मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपली परीक्षेची रणनीती तयार केली.

परिस्थिती बदलायची असेल, तर पूर्ण ताकदीने कठोर परिश्रम करा

सततच्या अपयशामुळे निराश होणाऱ्या उमेदवारांसाठी मनोज पाल यांचा एक संदेश आहे. ते म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीने आपली परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यांनी पूर्ण ताकदीने कठोर परिश्रम केले पाहिजेत. आपली बलस्थाने आणि कमकुवतपणा ओळखला पाहिजे आणि स्वतःमध्ये सतत सुधारणा केली पाहिजे. त्यांचा विश्वास आहे की अपयशानंतरही आत्मविश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. सुमारे 40 परीक्षा दिल्यानंतर मिळवलेले हे यश मनोजसाठी केवळ एक काम नसून, अनेक वर्षांच्या संघर्षाचा आणि संयमाचा विजय आहे.