केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि द इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन म्हणजेच द आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कॉन्क्लेव्हचं आयोजनं अरुणाचल प्रदेशमधील नमसाई येथे करण्यात आलं. बुद्ध धम्म आणि ईशान्य भारतातील संस्कृती या नावानं ही कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री छोवना मेईन हे उपस्थित होते.
ईशान भारत म्हणजेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही बौद्ध परंपरांची, भिक्खू संस्कृती आणि वारशाची केंद्र आहेत. या विभागात अनेक बौद्ध परंपराचं संवर्धन आणि प्रसार करण्यात आला. यामध्ये थेरवदा, महायान आणि वज्रयान यांचा त्यामध्ये समावेश होतो.
भारत सरकारकडून बौद्ध पर्यटन, वारशाचं संवर्धन, सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमासाठी विविध अभियानांचं आयोजन केलं जातंय. या माध्यमातून या भागातील बुद्ध धम्माला भक्कम करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ईशान्य भारतातील बुद्ध धम्म आणि संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आयबीसीकडून दोन दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजनं नवसाई येथील सांस्कृतिक भवनमध्ये करण्यात आलं.
पहिल्या दिवशी ऐतिहासिक महत्त्व, या भागातील कला आणि संस्कृती आणि बुद्ध धम्माचा शेजारील राष्ट्रांवरील सांस्कृतिक प्रभाव या संदर्भातील चर्चासत्र आयोजित करण्यात आली. दुसऱ्या दिवशी विपश्यना आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना सुवर्ण पॅगोडा येथे आयोजित करण्यात आली.
ऐतिहासिकदृष्ट्या सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध धम्म ईशान्य भारतात पोहोचला. यासह तो शेजारच्या देशात देखील पोहोचला भारताला दक्षिण पूर्व आशियाशी जोडण्यात बुद्धिस्ट सांस्कृतिक कॉरिडॉरची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
ईशान्य भारतातील अनेक आदिवासी जमाती या बुद्ध धम्माशी त्यांच्या पारंपारिक रुढींसह जोडले गेले आहेत. वैविध्यपूर्ण बौद्ध परंपरा,थेरावदा, महायान आणि वज्रयानचा इथं विकास झाला.
आयबीसीची प्राथमिक ओळख
द इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन ही जागतिक बुद्धिस्ट संस्था असून याचं मुख्यालय नवी दिल्लीत आहे. या संस्थेचे सभासद जगभर आहेत. यामध्ये भिक्खू आणि उपासकांचा समावेश आहे. यामध्ये जागतिक कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रादेशिक फेडरेशनचा समावेश आहे. यामध्ये मंदिरावरील समितीचा देखील समावेश आहे. याचं कार्य सर्वोच्च बौद्ध धार्मिक संरचनेच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आलं.
नवी दिल्लीतील 2011 मधील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत आयबीसीची संकल्पना समोर आली. त्यावेळी जगभरातील 11 देशांनी एकमातनं नव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेची भारतात गरज असल्याच्या विचारावर सहमती दर्शवली. बुद्ध धम्माचा उगम भारतात झाला, त्याची भरभराट आणि विस्तार झाला. त्यामुळं आयबीसीच्या रुपात एक सामुदायिक मंच जगभरातील बुद्ध धम्माच्या लोकांसाठी स्थापन केला गेला.
सामुदायिक वारसा आणि एकत्रित आवाज (Collective Wisdom, United Voice) या ब्रीद वाक्यानुसार बौद्ध मूल्यांच्या आणि तत्वांना जागतिक संदर्भात प्रसारित आणि सादर करण्याचा जगातील मानवाच्या दृष्टीनं आयबीसीचा प्रयत्न आहे.