दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे तुकडे गँगने दिल्लीत अशांतता पसरवली असा आरोपही शाह यांनी यावेळी केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. दिल्लीत आज आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. शाह म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधी पक्षांनी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल केली आहे. दिल्लीची शांतता भंग केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँग दिल्लीच्या अशांततेला जबाबदार आहे. दिल्लीच्या जनेतेने त्यांना दंड दिला पाहिजे.

केजरीवाल यांचा अमित शाह त्यांनी समाचार घेतला. केजरीवाल सरकार विकास कामात अडथळा निर्माण करण्याचे काम करते असा आरोप केला. केजरीवाल फक्त जाहिराती देऊन लोकांना फसवत आहेत. जीवनात त्यांना फक्त विरोध करणे आणि धरणे आंदोलन करण्याशिवाय दुसरे कामच येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

 CAA | काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँगने दिल्लीत अशांतता पसरवली : अमित शाह | ABP Majha



दिल्लीच्या जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योजनाबद्धरितीने काम होत असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेसला घेरण्यासाठी त्यांनी शीख दंगलीचा मुद्दा उपस्थित केला.काँग्रेसवर टीका करताना त्यांनी शीख दंगलीचा मुद्दा समोर आणला. शीख दंगलीच्या इतक्या वर्षांनंतरही काँग्रेसच्या सरकारमध्ये पीडितांना न्याय मिळाला नाही. मोदी सरकार सत्तेवर येताच एसआयटी स्थापन करण्यात आली.