Terrorists Attack In Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या (jammu-kashmir) बांदीपोरामध्ये (bandipora) दहशतवाद्यांनी (terrorist attack) सुरक्षा दलांच्या ताफ्यावर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असल्याचे समजते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. 7 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.


 


5 जवान जखमी, एका जवानाची प्रकृती चिंताजनक


जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. 7 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.


2 दिवसांपूर्वी दहशतवाद्यांचा पर्दाफाश केला होता.


2 दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांनी 11 जणांना अटक करून प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. एका अधिकाऱ्यानं मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रं आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह्य साहित्य जप्त करण्यात आली होती. "विश्वासार्ह माहितीच्या आधारे, अनंतनागच्या श्रीगुफवारा/बिजबेहारा भागात पोलीस/सुरक्षा दलांवर, विविध ठिकाणी उभारलेल्या अनेक चेक पोस्टवर हल्ला करण्याची बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेनं जैश-ए-मोहम्मदचा कट रचला होता", असं प्रवक्त्यानं सांगितलं होतं. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तींनी खुलासा केला की, ते जैश-ए-मोहम्मदचे साथीदार आहेत आणि ते पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या मालकांच्या थेट संपर्कात आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर ते पोलीस/सुरक्षा दलांवर हल्ला करणार होते. "त्यांच्या खुलाशानंतर, आणखी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली," ते म्हणाले, बिजबेहारा भागात सहा दहशतवाद्यांना अटक करून पोलिसांनी आणखी एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होती.


 


याआधी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात अंमली पदार्थ-दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला होता. ज्यामध्ये दोन लोकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून 18 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं होतं. एका पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं की, दाचीकडून बसग्रानच्या दिशेने एक पोलिस पथक परिसरात गस्त घालत होते तेव्हा त्यांना दाचीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन वाहनं संशयास्पद स्थितीत दिसली.