नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने भारतात पठाणकोटसारख्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याची माहिती आहे. जम्मू आणि पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेकडून दहशतवादी घुसखोरी करु शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.


दहशतवादी घुसखोरी करत असताना पाकिस्तानी रेंजर्स कव्हर फायरिंग करुन त्यांना मदत करु शकतात, अशी माहिती आहे. नजरकैदेतून सुटल्यानंतर हाफिज सईद पठाणकोटमध्ये झालेल्या हल्ल्यासारखे दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखत आहे. गुप्तचर यंत्रणांच्या या इशाऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर ट्रिपल हाय अलर्ट देण्यात आला आहे.

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची स्थापनाही त्यानेच केली आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यातही त्याचा होत होता. शिवाय तो मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. हाफिज सईद भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.

एप्रिल 2012 मध्ये, अमेरिकेने दहशतवादासाठी जबाबदार असलेल्यांची यादी जारी केली. या यादीत हाफिज सईदचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. अमेरिकेने हाफिज सईदला पकडून देण्यासाठी एक कोटी डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं आहे. तर भारताने त्याच्या विरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही जमात-उद-दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.

संबंधित बातम्या

हाफिज सईदला पुन्हा डांबलं, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नमलं

माझं नाव दहशतवाद्यांच्या यादीतून हटवा, हाफिज सईदची UN कडे मागणी

हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकला खडसावलं

हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता

26/11 ला 9 वर्षे पूर्ण, हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही मोकाट

‘हाफिजच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांकडून 8 कोटीची सुपारी’