जम्मू- काश्मीर : श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे.
या हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस महानिरिक्षक म्हणाले, हल्लेखोर मारुती कारमध्ये आले होते. त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे. शोधमोहिम सुरू असून संध्याकाळपर्यंत या विषयी अधिक माहिती मिळेल. या हल्ल्यात आपले दोन जवान शहीद झाले आहे.
जवानांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोन जवान गंभीररित्या जखमी झाले, त्यानंतर त्यांचे निधन झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ही संघटना या भागात अॅक्टिव्ह आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले आहे. या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी पाकिस्तानी असून एक दहशतवादी स्थानिक असल्याचा अंदाज आहे.