स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2016 06:01 AM (IST)
श्रीनगर : एकीकडे देशभरात 70 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना, दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. नौहट्टा परिसरात दशतवद्यांनी जवानांना लक्ष्य केलं. अतिरेक्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सीआरपीएफचे सात जवान जखमी आहे. तर एका जवानांनी एका अतिरेक्याचा खात्मा केला आहे. एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दुसरीकडे काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दरम्यान, हिंसाचारामुळे मागील 38 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील अनेक जिल्ह्यात कर्फ्यू आहे. मोदींचा पाकिस्तानवर निशाणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केल्यानंतर काही वेळातच हा हल्ला झाला. शिवाय पाकिस्तानात दहशतवाद ग्लोरीफाय केला जात आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला होता. तसंच स्वतंत्र भारतात हिंसा आणि अत्याचाराला अजिबात थारा नाही. हा देश दहशतवाद, नक्षलवाद, माओवादासमोर झुकणार नाही. सर्वांनी सामान्य, आनंदी आयुष्य जगावं, यासाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं.