Tejas Fighter Jet Crash Timeline : दुबई एअर शोमध्ये भारताचे स्वदेशी लढाऊ विमान (Fighter Jet) तेजस गुरुवार, 21 नोव्हेंबर 2025 रोजी उड्डाणादरम्यान क्रॅश (Tejas Crash) झाल्याची धक्कादायक घटना घडली. 42 वर्षांच्या मेहनतीच्या या प्रवासाला एका क्षणात हादरा बसल्याची चर्चा आहे. तेजसच्या कामगिरीमुळे अनेक देश त्याची खरेदी करण्यासाठी तयार होते, मात्र या अपघाताचा भविष्यातील डिफेन्स डीलवर (Defence Deal)परिणाम होऊ शकतो. भारताचे स्वदेशी फायटर जेट तेजसचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊयात.
तेजसच्या निर्मितीची संपूर्ण टाइमलाइन (Full Timeline).
तेजसची सुरुवात (Tejas Origin)
1983 मध्ये भारत सरकारने जुन्या MiG-21 ला बदलण्यासाठी LCA (Light Combat Aircraft) प्रकल्पाची घोषणा केली. 1984 मध्ये या प्रकल्पासाठी ADA (Aeronautical Development Agency) तयार करण्यात आली.
प्रकल्पाला वेग (Tejas Project Development)
1986 मध्ये FSED फेज-1 साठी 575 कोटींची मंजुरी मिळाली आणि 1989 मध्ये HAL ला विमानाच्या निर्मितीची जबाबदारी देण्यात आली.
पहिले उड्डाण आणि पुढील टप्पे (Milestones & First Flights)
1995 मध्ये पहिला टेक्नोलॉजी डेमोन्स्ट्रेटर TD-1 तयार झाला आणि 4 जानेवारी 2001 रोजी TD-1 ने बंगलुरुमध्ये 18 मिनिटांचे यशस्वी उड्डाण घेतले, हा प्रकल्पासाठी ऐतिहासिक क्षण होता.
2003 मध्ये PV-1, 2007 मध्ये PV-3 ने सुपरसोनिक उड्डाण साधले.
2011 मध्ये तेजसला IOC म्हणजेच Initial Operational Clearance मिळाले.
तेजस स्क्वाड्रनची निर्मिती (Formation of Tejas Squadron)
2013 मध्ये IAF साठी 45 स्क्वाड्रन ‘फ्लाइंग डॅगर्स’ ची योजना आखली गेली.
जानेवारी 2015 मध्ये IAF ला पहिला सीरिज प्रोडक्शन तेजस देण्यात आला.
1 जुलै 2016 रोजी ‘फ्लाइंग डॅगर्स’ स्क्वाड्रन अधिकृतपणे IAF मध्ये दाखल झाली.
नौदलाचा मोठा टप्पा (Navy Variant Milestone)
20 डिसेंबर 2019 रोजी तेजसचा नेव्ही व्हेरिएंट यशस्वीरीत्या INS विक्रमादित्यवर उतरले. हा भारतीय नौसेनेसाठी मोठा बदल होता.
इतिहासातील सर्वात मोठी स्वदेशी डिफेन्स डील (Largest Indigenous Defence Deal)
जानेवारी 2021 मध्ये भारत सरकारने 48,000 कोटींचा करार मंजूर केला.
73 तेजस Mk1A फायटर
10 ट्रेनर जेट्स
हा भारताच्या लष्करी विमान इतिहासातील सर्वात मोठा स्वदेशी व्यवहार मानला जातो.
Mk1A चे नवे फीचर्स (Mk1A Features)
मार्च 2023 मध्ये HAL ने Mk1A चे उत्पादन सुरू केले. त्यामध्ये खालील अॅडव्हान्सड् फीचर्स देण्यात आले.
AESA रडार
इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट
मिड-एअर रिफ्यूलिंग
हलके वजन
सुधारित अवियॉनिक्स
2024–2025: नवी डिलिव्हरी (Upcoming Delivery)
IAF ला पहिले Mk1A जेट 2024–25 मध्ये मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती.
पुढची पिढी: तेजस Mk2 आणि AMCA (Future Indian Fighters)
तेजस Mk2 (Medium Weight Fighter)
AMCA (Advanced Medium Combat Aircraft)
ही बातमी वाचा:
