एक्स्प्लोर

DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 

DMK : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशभरात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काँग्रेसनं तामिळनाडूत द्रमुकची साथ सोडताच द्रमुकनं देखील मोठा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : इंडिया आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या द्रमुकनं मोठा निर्णय घेतला आहे. द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.द्रमुकच्या या निर्णयानं इंडिया आघाडीला धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेसनं एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत द्रमुकला पराभवाचा सामना करावा लागला, यानंतर काँग्रेसनं थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं द्रमुक नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय. 

कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की द्रमुक खासदारांच्या लोकसभेतील बैठक व्यवस्थेत बदल करण्यात यावेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबतची आघाडी संपली आहे. त्यामुळं लोकसभेत सध्याची बैठक व्यवस्था आहे, त्यानुसार काँग्रेस सोबत बसणं योग्य होणार नाही.  द्रमुकच्या लोकसभेतील खासदारांची बैठक व्यवस्था वेगळी करण्यात यावी, असं कनिमोळी यांनी म्हटलं आहे.

तामिळनाडूत द्रमुकचा पराभव

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा मोठा पराभव झाला. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आणि द्रमुकनं आघाडी करत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत एमके स्टॅलिन यांचा कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. 234 जागांपैकी द्रमुकला 59 जागांवर विजय मिळाला. तर, थलपती विजय यांच्या TVK पक्षाला 108 जागांवर विजय मिळाला. अण्णाद्रमुक पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला. यामुळं तामिळनाडूच्या विधानसभेचा निकाल त्रिशंकू बनला आहे. काँग्रेसनं 5, पीएमके 4, माकप 2, भाकप 2,इंडियन यूनियन मुस्लीम लीगनं 2, भाजपनं 1 आणि डीएमडीके आणि अम्मा मुक्कल मुनेत्र कळघम पक्षानं एका जागेवर विजय मिळवला आहे.

तामिळनाडूतील टीव्हीके पक्षाला आणखी दोन आमदारांचा पाठिंबा मिळालेला आहे. माकपचे तामिळनाडू विधानसभेत 2 आमदार विजयी झाले आहेत. या दोन आमदारांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे. यामुळं टीव्हीकेला आतापर्यंत 114 आमदारांचं पाठबळ मिळालेलं आहे. टीव्हीके पक्षानं तामिळनाडूत 108 जागांवर विजय मिळवलेला आहे. यामध्ये विजय दोन जागांवर विजयी झाले आहेत, त्यामुळं टीव्हीकेचं संख्याबळ 107 वर येतं. याशिवाय काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिल्यानं संख्याबळ 112 वर पोहोचतं, माकपच्या दोन आमदारांनी पाठिंबा दिल्यानं त्यांचं टीव्हीकेला पाठिंबा असणाऱ्या आमदारांची संख्या 114  झाली आहे. याशिवाय टीव्हीकेला भाकपच्या 2 आमदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तो पाठिंबा मिळाल्यास संख्याबळ 116 वर जाईल  यानंतर विजय यांना आणखी दोन आमदारांची गरज लागेल. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Trinamool Congress Crisis: तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
Bihar Police Recruitment Exam: बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget