Video : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मुस्लीमांना सुद्धा गोळ्या घातल्या, पहिल्यांदा हिंदुस्थानी म्हणत स्थानिकांनी विराट कँडल मार्च काढत दिली पाकिस्तानला चपराक
Pahalgam Candle March : मृताच्या आईने घरातील एकमेव हात गेल्याने आक्रोश केला. तो घोडा चालवत होता आणि घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती, असे धाय मोकलून रडत सांगितले.

Pahalgam Candle March पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत 8 ते 10 दहशतवादी सहभागी असू शकतात. स्थानिक मदतनीस असलेले 2 ते 3 दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात असल्याचा संशय आहे. त्याच वेळी, 5 ते 7 दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात पहलगाममधील दोन स्थानिक मुस्लीमांना सुद्धा गोळ्या घालण्यात आल्या आहेत. यानंतर मृताच्या आईने घरातील एकमेव हात गेल्याने आक्रोश केला. तो घोडा चालवत होता आणि घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती, असे धाय मोकलून रडत सांगितले.
#WATCH | J&K | Mother of the Anantnag resident Syed Hussain Shah, who lost his life in the #PahalgamTerroristAttack, gets emotional, says, "He was the only bread earner of the family..." pic.twitter.com/W7BgzeVOEC
— ANI (@ANI) April 23, 2025
आधी हिंदुस्तानी आहोत, त्यानंतर आम्ही काश्मीरी
दरम्यान, पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर स्थानिकांनी कँडल मार्च काढून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. “ज्या अतिरेक्यांनी हा भ्याड हल्ला केला, त्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही आधी हिंदुस्तानी आहोत, त्यानंतर आम्ही काश्मीरी”, अशी भावना कँडलमार्चमध्ये सामील असलेल्या लोकांनी व्यक्त केली. दुसरीकडे, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना या भागात पोहोचण्यास मदत केली. तसेच, कोणालाही संशय येऊ नये म्हणून, तेच लोक स्थानिक भाषेत बोलत पुढे जात होते आणि पाकिस्तानी दहशतवादी त्यांच्यासोबत घटना घडवलेल्या ठिकाणी पोहोचले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक हत्यांमध्ये पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सहभागी असल्याचे वृत्त आहे.
VIDEO | J&K: Locals of Pahalgam hold candle march for terror attack victims demanding justice.
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/F19rAK7tFf
दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होते
स्थानिक दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ला झाल्यास पर्यटकांपर्यंत कोणतीही मदत पोहोचू नये म्हणून त्यांनी संपूर्ण परिसराची रेकी करून माहिती गोळा केली होती.
पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानने काय म्हटले?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर शेजारी देश पाकिस्तानची पहिली प्रतिक्रियाही आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. ते म्हणाले की आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो.
इतर महत्वाच्या बातम्या























