नवी दिल्ली : केंद्रीय सचिवालयातील अनेक अधिकाऱ्यांना (Central Govt officer) मंगळवारी एक संशयास्पद ईमेल (emails) प्राप्त झाला आहे. या घटनेनंतर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका संघटनेने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. विविध मंत्रालयांमध्ये कार्यरत केंद्रीय सचिवालय सेवा (CSS) अधिकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, त्यांची अधिकृत मेल खाती रद्द केली गेली नाहीत याची खात्री करण्यासाठी त्यांना एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले होते.


माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती


सीएसएस अधिकारी केंद्रीय सचिवालयाचा कणा आहेत अशा आशयाची पोस्ट केंद्रीय सचिवालय सेवा अधिकाऱ्यांची संघटना असलेल्या सीएसएस फोरमने ट्विटरवर केली आहे. फोरमने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.


 अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना


सीएसएस फोरमचे सरचिटणीस आशुतोष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयित मेल आलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबबात अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. केंद्रीय सचिवालयाचे संपूर्ण कामकाज आता ऑनलाइन होत असल्याने अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मिश्रा म्हणाले. आमच्या संपर्काची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं.


महत्वाच्या बातम्या:


Gmail Tips : तुमच्या Gmail वर हॅकर्सची करडी नजर! Gmail सुरक्षित ठेवण्याचे 'या' दोन महत्वाच्या टिप्स!