नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज प्रकृती अस्वाथ्यामुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत, पण त्यांचं काम मात्र अजूनही सुरुच आहे. अमेरिकन वंशाच्या महिलेवर बलात्कार झाल्याच्या वृत्तानंतर सुषमा स्वराज यांनी याची दखल घेतली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अहवाल देण्यासाठी सांगितल्याचं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं.


https://twitter.com/SushmaSwaraj/status/804699416439308288

https://twitter.com/SushmaSwaraj/status/804699722434822144

https://twitter.com/SushmaSwaraj/status/804700094712811520
दिल्ली पोलिसांना दोषींना पकडण्याचे आदेश

सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाली असून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु आहे. अमेरिकन महिलेवर बलात्कार झाल्याप्रकरणी त्यांनी ट्वीट केलं आहे की, "दिल्लीत मार्चमध्ये एका अमेरिकन पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याचं वृत्त मीडियात पाहिलं. मी दिल्लीच्या उपराज्यपालांसोबत याबाबत चर्चा केली आहे आणि दिल्ली पोलिसांना गुन्हा दाखल करुन दोषींना पकडण्याचे आदेश देण्यास सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही दोषींना सोडणार नाही, असा विश्वास पीडितेला देण्यासाठी सांगितलं आहे.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/804933599648620544

https://twitter.com/SushmaSwaraj/status/804933700118941696

https://twitter.com/SushmaSwaraj/status/804934233428873216

काय आहे प्रकरण?

अमेरिकन महिलेने एका एनजीओच्या माध्यमातून दिल्ली पोलिसात तक्रार केली आहे. पाच जणांनी दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरातील हॉटलेमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तिचा टुरिस्ट गाईडचाही समावेश होता. या घटनेनंतर महिला अमेरिकेत परतली. पण तिथे गेल्यावर तिला डिप्रेशन आलं. अखेर तिने तक्रार दाखल करण्याचा निश्चय केला.

आजारी असूनही कामावर परिणाम नाही!

रुग्णालयात असूनही सुषमा स्वराज त्यांच्या कामावर परिणाम होऊ देत नाहीत. सुषमा स्वराज कायम परराष्ट्र सचिवांच्या संपर्कात आहेत. इतकंच नाही तर महत्त्वाच्या फाईलसह नोट्सही त्या नजरेखालून घातल आहे.

दरम्यान अमृतसरमध्ये होणाऱ्या 'हार्ट ऑफ एशिया' संमेलनात सुषमा स्वराज सहभागी होणार नाहीत. या संमेलनात सुषमा स्वराज यांच्याऐवजी अर्थमंत्री अरुण जेटली सहभागी होणार आहेत.