Solar Eclipse 2022 : आज खंडग्रास सूर्यग्रहण (Continental Solar Eclipse) आहे. हे सूर्यग्रहण भारतासह जगातील अनेक भागांमध्ये पाहता येणार आहे. हे ग्रहण भारतात दुपारनंतर दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही एक खास पर्वणी आहे. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. भारतासह आशिया खंडाच्या मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेश, युरोप, अफ्रिका खंडाचा पूर्वोत्तर भाग या प्रदेशात ग्रहण पाहता येणार आहे.

Continues below advertisement

खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. यादरम्यान जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये अंशतः येतो तेव्हा सूर्याचा काही भाग झाकला जातो. या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. जेणेकरून पृथ्वीवरील विशिष्ट स्थानावरून पाहिल्यास सूर्याचा अर्धा भागच दिसतो. 

Continues below advertisement

आज खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी आहे.

सूर्यग्रहण कुठे आणि केव्हा पाहता येईल? (Where to Watch Solar Eclipse 2022)

  • मुंबई : दुपारी 4.49 ते 6.09 वाजेपर्यंत
  • दिल्ली : दुपारी 4.29 ते 5.42 वाजेपर्यंत
  • कोलकाता : दुपारी 4.52 ते 5.03 वाजेपर्यंत
  • चेन्नई : संध्याकाळी 5.14 ते 5.44 वाजेपर्यंत
  • बेंगळुरू : संध्याकाळी 5.12 ते 5.55 वाजेपर्यंत
  • पाटणा : दुपारी 4.42 ते 5.23 वाजेपर्यंत
  • गांधीनगर : दुपारी 4.37 ते 6.05 वाजेपर्यंत
  • डेहराडून : दुपारी 4.26 ते 5.36 वाजेपर्यंत
  • इंदूर : दुपारी 4.42 ते 5.53 वाजेपर्यंत
  • उदयपूर : दुपारी 4.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत
  • लुधियाना : दुपारी 4.22 ते 5.44 वाजेपर्यंत
  • शिमला : दुपारी 4.23 ते 5.39 वाजेपर्यंत
  • अमृतसर : दुपारी 4.19 ते 5.48 वाजेपर्यंत
  • भोपाळ : दुपारी 4.49 ते 5.46 वाजेपर्यंत
  • जयपूर : दुपारी 4.31 ते 5.49 वाजेपर्यंत
  • रायपूर : दुपारी 4.51 ते 5.31 वाजेपर्यंत
  • लखनौ : दुपारी 4.36 ते 5.29 वाजेपर्यंत

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)