नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त करण्यात आली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या ऑपरेशनसाठी भारतीय लष्कराने जाणीवपूर्वक अमावस्येच्या आदली रात्र निवडली.


सर्जिकल स्ट्राईकसाठी अमावस्येच्या आदली रात्र निवडण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे, मिट्ट काळोखात कारवाई यशस्वीपणे पार पडू शकते.  काळोखात कुणाला साधी सावलीही दिसणार नाही, असा त्यामागील तर्क होता. बुधवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्कराने स्पेशल फोर्स कंमांडोंच्या दोन तुकड्या उत्तर सीमेच्या दोन गुप्त ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे एलओसीच्या अगदी उतरवल्या.

दोन तुकड्यांमध्ये 4 पॅरा आणि 9 पॅरा होते. या दोन्ही तुकड्यांमधील एकूण 7 प्लाटून हल्ल्यात समाविष्ट होते. कारण एकूण 7 लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त करायचे होते. प्रत्येक प्लाटूनमध्ये 15 ते 20 कमांडो होते. एलओसीवर आधीपासूनच डोग्रा आणि बिहार रेजिमेंटचे कमांडो होते.

स्पेशल फोर्सच्या कमांडोचे सात प्लाटून एलओसीवर पोहोचल्यानंतर डोग्रा आणि बिहरा रेजिमेंटच्या कमांडोंनी सीमेपलिकडे तोफांद्वारे हल्ला सुरु केला. कमांडोंकडे कर्ल-गुस्तोव रायफल्स होत्या, ज्या ग्रेनेड लॉन्चरसारख्या असतात.

त्याचसोबत ज्वलनशील केमिकलही भारतीय जवानांकडे होते. प्रत्येक टीमकडे ड्रोन कॅमेर होते आणि नाईट व्हिजन कॅमेरेही होते. ज्यांद्वारे काळोखातील चित्र स्पष्ट दिसण्यास मदत होत होती.