एक्स्प्लोर

Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?

Supreme Court Form 6 Hearing : SIR मधील 'फॉर्म 6' च्या सुधारित आवृत्तीला सुप्रीम कोर्टाने कोणतीही मंजुरी दिलेली नाही, असे मुख्य न्यायाधीश सूर्यकांतयांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (ECI) गेल्या आठवड्यात दावा केला होता की, काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेसाठी ऑनलाईन 'फॉर्म 6' सोबत जोडलेल्या नवीन घोषणापत्राला (Declaration) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मान्यता दिली आहे. मात्र, सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश सूर्यकांत (CJI Surya Kant) यांनी निवडणूक आयोगाचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

"कोणत्याही सुधारित फॉर्म 6 (Form 6) ला आम्ही मंजुरी दिलेली नाही, हे स्पष्ट असायला हवे. जेव्हा कोर्टात रेकॉर्ड सादर केला जाईल, तेव्हा हा फॉर्म नेमका कोणी बदलला हे आम्हाला पाहायचे आहे," अशा अत्यंत कडक शब्दांत CJI सूर्यकांत यांनी निवडणूक आयोगाचे कान उपटले आहेत.

Election Commission Form 6 : काय आहे 'फॉर्म 6' मधील वादाचे मुख्य कारण?

'फॉर्म 6' च्या नव्या घोषणापत्रामध्ये बदल करण्याचा निर्णय वादात सापडला होता. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू (Sukhbir Singh Sandhu) आणि विवेक जोशी (Vivek Joshi) यांनी या बदलांवर तीव्र आक्षेप घेतला होता. 'केंद्र सरकारने मतदार नोंदणी नियम, 1960 (Registration of Electors Rules, 1960)' मध्ये सुधारणा केल्याशिवाय अशा प्रकारे फॉर्म बदलता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

या विरोधानंतरही नवीन फॉर्म लागू करण्यात आला. त्यानंतर टीका टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने 26 सप्टेंबर रोजी प्रसिद्धी पत्रक जारी करून बिहार SIR संदर्भात मे महिन्यात दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला दिला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने बिहारच्या निकालात या नवीन घोषणापत्राची कोणतीही तपासणी केली नव्हती, कारण तो बदल निकालाच्या नंतर करण्यात आला होता.

Modified Form 6 : नव्या 'फॉर्म 6' मध्ये नक्की काय बदल केले?

सुधारित 'फॉर्म 6' मधील नवीन नियमांनुसार, नवीन मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला खालील माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे,

स्वतःची किंवा पालकांची नाव नोंदणी मागील SIR प्रक्रियेत झाली होती की नाही हे सांगावे लागेल.

इतर राज्यांमधील SIR मध्ये वापरल्या गेलेल्या आधीच्या 'फॉर्म 6' मध्ये अशी अट नव्हती.

Supreme Court On Form 6 : याचिकेत काय मागण्या करण्यात आल्या आहेत?

ॲडव्होकेट शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग आणि महासंचालक (IT) सीमा खन्ना यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'लोकप्रतिनिधी कायदा, 1950 (Representation of the People Act, 1950)' च्या कलम 32 (Section 32) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आणि सायबर सुरक्षेच्या तज्ज्ञांच्या मदतीने या एकतर्फी निर्णयांची स्वतंत्र न्यायिक चौकशी (Judicial Inquiry) करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. CJI सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या याचिकेवर नोटीस बजावली असून पुढील सुनावणीसाठी ती संलग्न केली आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Chandrakant Patil On Fees Regulating Authority ACT: सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?
सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?
Kaziranga Accident: आसामच्या काझीरंगा महामार्गावर भीषण अपघात, 26 जणांचा दुर्दैवी अंत; पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपयांची मदत जाहीर
आसामच्या काझीरंगा महामार्गावर भीषण अपघात, 26 जणांचा दुर्दैवी अंत; पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपयांची मदत जाहीर
Advertisement

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
Embed widget