नवी दिल्ली : लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लीन चिट मिळाली आहे. लैंगिक अत्याचाराच्या कथित प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या त्रिसदस्यीय अंतर्गत समितीने गोगोईंना दिलासा दिला.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप निराधार आहेत, असं सांगत जस्टिस एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेतील तीन न्यायाधीशांच्या समितीने लैंगिक अत्याचाराची तक्रार फेटाळून लावली.
लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने याआधीच समितीवर प्रश्न उपस्थित केले होते. लैंगिक अत्याचाराच्या अधिनियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप तिने केला होता. लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यास दिरंगाई का केली, यावर समितीने वारंवार भर दिल्याचा दावा महिलेने केला होता.
तक्रारदार महिलेने या समितीत जस्टिस एन वी रमण यांचा सहभाग असल्याबद्दल आक्षेप घेतला होता. त्यानंतर जस्टिस एन वी रमण यांनी समिती सोडण्याचा निर्णय घेतला होता.
लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी महिला ही सुप्रीम कोर्टाची माजी कर्मचारी होती. सरन्यायाधीशांना अडकवण्यासाठी कट कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप वकील उत्सव बॅन्स यांनी केला होता.
लैंगिक अत्याचार आरोप : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून क्लीन चिट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 May 2019 06:04 PM (IST)
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप निराधार आहेत, असं सांगत जस्टिस एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेतील तीन न्यायाधीशांच्या समितीने लैंगिक अत्याचाराची तक्रार फेटाळून लावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -