Supreme Court on Vijay Shah: मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी कर्नल सोफिया कुरेशी (Sofia Qureshi) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही भाजप मंत्री विजय शहांना फटकारलंय . ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून बोलताना मध्य प्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख 'अतिरेक्यांची बहीण' असा केला होता .या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ झाल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंत्री विजय शाह यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा आदेश दिला होता . हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या शहांना आता सर्वोच्च न्यायालयाने ही फटकारले आहे . मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिलेली देण्यात आलेली नसल्याचे सांगत सर न्यायाधीश बी .आर .गवई ( CJI B.R. Gawai) यांनी विजय शहांना चांगलंच सुनावलंय . 

सरन्यायाधीश बी . आर . गवई काय म्हणाले?

भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई ( CJI BR Gavai) यांनी 'संविधानिक पदावर असलेली व्यक्ती असे वक्तव्य करूच कसे शकते ?' असा सवाल करत भाजप मंत्री विजय शाह यांच्या विरोधात दाखल झालेल्या FIR प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला . सरन्यायाधीश म्हणाले, 'तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात , बरोबर ?' यावर मंत्री विजय शहा यांचे वकील यांनी त्यांच्या आशिलांनी माफी मागितलाच सांगितलं .माध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला आहे .विजय शाह यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाने आदेश देण्यापूर्वी आमचे म्हणणे ऐकलेले नाही असा युक्तिवाद केला . पण यावर सरन्यायाधीश बी. आर गवई यांनी 'तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत?' असा सवाल करत 'आपण उद्या या प्रकरणाची सुनावणी घेऊ या 24 तासात काहीही होणार नाही', असे म्हणत मंत्री विजय शहा यांच्या विरुद्धच्या FIR ला स्थगिती देण्याच्या मागणीवर नकार दिलाय . 

सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली

मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर महू तहसील मधील मानपुर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मध्य प्रदेश हायकोर्टाच्या स्पष्ट आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली होती .मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या तीन गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आज उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली .

मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर बोलताना भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्याची बहीण असा उल्लेख केला .त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ उडाला .काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांनी मंत्री विजय शहांची भाजपमधून हकलपट्टी करण्याचा आदेश द्यावेत अशी मागणी केली . वाद चिघळत असल्याचे पाहून त्यांनी समाज माध्यमावर माफीनामा प्रसिद्ध केला .आणि उच्च न्यायालयाच्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली . मात्र सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश बी आर गवई यांनी मंत्री विजय शाह यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे दिसले .

हेही वाचा:

कर्नल सोफिया कुरेशींबाबत चीड आणणारं वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या मंत्र्याचा मुजोरपणा, गुन्हा दाखल करण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान