Supreme Court angry on woman : 'लग्न झालेलं असताना दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवता, तर तुमच्यावर खटला चालवला जाऊ शकतो,' असं सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court angry on woman) एका महिलेच्या बाबतीत म्हटलं आहे. जिने तिच्या पार्टनरवर बलात्काराचे आरोप केले होते. संबंधित महिला आरोपीला जामीन देण्याच्या विरोधात होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court angry on woman) तिचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत आरोपीला दिलेला जामीन योग्य ठरवला.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने बुधवारी (16 जुलै 2025) या प्रकरणाची सुनावणी करताना संबंधित महिलेला चांगलंच सुनावलं. महिलेचा आरोप आहे की, आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि जेव्हा तिने पतीपासून घटस्फोट घेतला, तेव्हा आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.

याचिकाकर्त्या महिलेच्या वकिलाने मांडलेल्या युक्तिवादांवर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, "तुम्ही एक विवाहित महिला आहात आणि तुमची दोन मुलं आहेत. तुम्ही परिपक्व महिला आहात आणि तुम्हाला या नात्याची पूर्ण जाणीव होती, जे नाते तुम्ही लग्न झालेलं असतानाच दुसऱ्या पुरुषाशी निर्माण करत होतात."

महिलेच्या वकिलाने पुन्हा एकदा दावा केला की, आरोपी वारंवार तिला हॉटेलमध्ये बोलवत असे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विचारले, "मग तुम्ही त्याचं बोलावणं का मान्य करत होतात? तुम्हाला चांगलं माहित आहे की विवाहित असताना दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हा आहे."

महिलेने पटणा उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यात आरोपीला  जामीन मंजूर करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नव्हते.

साल 2016 मध्ये सोशल मीडियावरून महिलेची आरोपीशी ओळख झाली होती. महिलेचा आरोप आहे की, आरोपीच्या दबावामुळेच तिने 6 मार्च रोजी आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. मात्र जेव्हा तिने आरोपीकडे लग्नाची मागणी केली, तेव्हा त्याने लग्नास नकार दिला. यामुळे ती महिला चांगलीच संतप्त झाली आणि तिने बिहार पोलिसांकडे तक्रार केली की आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आहे. मात्र, पटणा उच्च न्यायालयाने आरोपीला जामून दिला, कारण न्यायालयाने सांगितले की घटस्फोटानंतर आरोपीने तिच्याशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नव्हते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

भास्कर जाधव एकनाथ शिंदेंवर घसरले, शंभूराज देसाई, योगेश कदम चांगलंच भडकले; ठाकरे गटाला इशारा