Super El Nino : 'एल निनो'ची (El Nino) एक संभाव्यतः तीव्र घटना जागतिक चिंतेचे कारण बनली आहे. कारण येऊ घातलेला अल निनो हा शतकातला सर्वात तीव्र असू शकतो, अशीभीतीव्यक्तकरण्यातआलीआहे. शिवायत्याचापरिणाम जगभरात भयानक परिस्थिती निर्माणकरण्यासकारणीभूतठरणार असल्याचीहीशक्यताआहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, ही घटना 1877-78 मधील त्या विनाशकारी पर्वाशी बरोबरी करू शकते. किंबहुना, त्याहूनही अधिक तीव्र ठरू शकते जे मानवी इतिहासातील सर्वात प्राणघातक हवामान घटनांपैकी एक मानले जात आहे. त्या ऐतिहासिक 'एल निनो' घटनेमुळे जगाच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा, दीर्घकालीन दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि भीषण अन्नटंचाई (दुष्काळ) निर्माण झाली होती. यामुळे लाखो लोकांचा बळी गेला, ज्यांची संख्या त्या काळातील एकूण जागतिक लोकसंख्येच्या सुमारे 4% इतकी असल्याचा अंदाज आहे. ECMWF यायुरोपियनदेशातीलवेधशाळेनेहाअंदाजव्यक्तकरतभीतीव्यक्तकेलीआहे.
EL Nino Effect : जगातील अनेक देशांसह भारतावरही होण्याची भीती
जगभरातील हवामान तज्ज्ञांनी यंदाच्या वर्षाच्या उत्तरार्धात ‘सुपर एल निनो’ येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा एल निनो अत्यंत तीव्र असू शकतो आणि त्याचा परिणाम जगातील अनेक देशांसह भारतावरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेयाबाबत भारताने चिंता करावी का? असाप्रश्नहीनिर्माणझालाआहे. भारतासाठी धोके विशेषतः मोठे आहेत. देशाची कृषी, जलस्रोत आणि एकूण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून आहे, आणि एल निनोच्या घटनांमुळे मान्सून कमकुवत होतो हे सर्वश्रुत आहे.
El Nino : दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा, पाणीपुरवठ्यावर ताण
दरम्यान, 2026 मध्ये एखादी तीव्र घटना घडल्यास, मान्सूनच्या हंगामात सामान्यपेक्षा कमी पावसासोबतच उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात तीव्र आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. या एकत्रित परिणामांमुळे पाणीपुरवठ्यावर ताण येऊ शकतो, पिकांचे उत्पन्न घटू शकते आणि अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. तीव्र उष्णता आणि आर्द्रतेमुळे शहरी भागांना आरोग्याच्या वाढत्या धोक्यांचाही सामना करावा लागू शकतो. अल निनोचा धोका लक्षात घेता या पार्शवभूमीवर कृषी विभागाने कमी पावसात अधिक उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरवात केली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान वापरणे, रुंद वरंभे पद्धतीने पिकाची लागवड कशी करणे यासाठी नागपूर कडक उन्हात कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. या माध्यमातून येणाऱ्या खरीप हंगामात अल निनोच्या प्रभावाशी लढता येऊन कमी पावसात देखील अधिक उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी सरकारचा प्रयत्न करत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
IMD: हवामान खात्याकडून काय माहिती देण्यात आली आहे?
अल निनोचा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक परिणाम. सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदाच्या पावसाळ्यात असेल.
2015 मध्ये पाऊस येऊन गेल्यावर 45 टक्के पाणीसाठा होता, तो आज आपल्याकडे पाऊस यायच्या आधी आहे. त्यामुळे परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊ.
मे महिन्यात उन्हाची तीव्रता कमी असेल, पण उष्णतेच्या लाटा अधिक असतील. पॉझिटिव्ह आयओडी विकसित झाल्यास परिणामांची तीव्रता कमी असेल.
जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांची कामे तातडीने आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण करा - मुख्यमंत्र्यांचे आदेश
त्यासाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन ही कामे प्राधान्याने करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- 2015 नंतर बरेच काही आपण शिकलो आहोत. कमी पावसात सुद्धा सिंचन देणारे हेच साधने आहेत
-पाऊस कमी असल्याने पुढच्या उन्हाळ्याचा सुद्धा आतापासून विचार करावा लागेल. चारा टंचाई होणार नाही याची काळजी घ्या. कारण इतर राज्यातही तशीच परिस्थिती असेल.
-पाणी वाचवण्यासाठी आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी प्रत्येक जिल्ह्यात टीम तयार कराव्या
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना
