कोल्हापूर : देशभरात वाढलेल्या साखरेच्या दरावरुन शेतकरी (Farmer) नेतेही आक्रमक झाले आहेत. कारण, एकीकडे दरवाढीने सर्वसामान्य ग्राहक संतापला असून दुसरीकडे दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याने शेतकरीही चिडले आहेत. साखरेचं दर वाढले आहेत, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता तर आम्हाला आनंद झाला असता. केंद्र सरकारने 10 लक्ष टन साखर (Sugar) आयात करण्याचा निर्णय घेतला, आता आयात करण्यात आलेली साखर ऑक्टोबरमध्ये येणार, त्याच काळात साखर करखाने सुरू होणार, त्यामुळे दर कोसळणार, असे म्हणत केंद्र सरकारच्या धोरणावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी दर्शवली आहे. राजू शेट्टी (Raju shetti) यांनी साखरेच्या वाढलेल्या दरासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले आहे. 

Continues below advertisement

महिन्याला साखरेचा 22 लाख टन कोटा दिला जातो, सरकारने दिलेल्या 45 ते 48 लाख टन साखरेचा हिशोब लागत नाही. रिकव्हरी चोरून, साठवून ठेवलेली साखर चढ्या दराने विकायची असे धोरण दिसत आहे. राज्यातील काही साखर कारखान्यानी टेंडर काढलं, पण साखर विकली नाही. त्यामुळे, साखरेचा भाव वाढवायचा असे आधीच ठरवलेलं होत,देशात साखर घोटाळा झाला असून सरकारचे नियंत्रण नसल्याचा आरोपही राजू शेट्टींनी केला आहे. सरकारने जर नियंत्रण ठेवले असत घोडे बाजार झाला नसता, सण आहेत म्हणून दर वाढवायचा. सरकारने दिलेल्या आकडेवारीवरुन साखर कमी पडायची आवश्यकता नाही. पुढच्या वर्षी 300 लाख टन साखर उत्पादित होईल. मी प्रधानमंत्री यांना पत्र लिहलं आहे. केवळ साखर मिळत नाही म्हणून लोक अस्वस्थ झाले नाहीत, साखरेची किंमतही वाढली आहे. त्यामुळे, साखरेचे गोडाऊन तपासले पाहिजे, कागदावर अन् गोडाऊनची तपासणी झाली पाहिजे. 

साखरेचे दर वाढवून काही लोक पैसा कमवत आहेत याची सखोल चौकशी व्हावी, खरोखरच साखरेची टंचाई असती तर महाराष्ट्रच काय देशात कुठेही साखर मिळत नाही म्हणून लोक अस्वस्थ झालेले पाहायला मिळत नाहीत. साखर फक्त महाग झाली आहे. टंचाईच नसेल तर अचानक दरवाढ व्हायचं कारण काय? या दरवाढीचा शोध घ्यायचा असेल तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांचे आणि साखर कारखानदारांचे गोडाऊन तपासावेत, कागदावर किती स्टॉक आहे आणि गोडाऊनमध्ये किती आहे. याची चौकशी झाली पाहिजे आणि रेकॉर्डवर नसलेली साखर जप्त केली, पाहिजे अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे

Continues below advertisement

चोरट्या मार्गाने विदेशात साखर जातेय

केंद्र सरकारने निर्यातवर बंदी घातली, पण चोरट्या मार्गाने साखर बांगलादेश, पाकिस्तान मध्ये गेली का? जर साखर बाहेर गेली तर गृह खात काय करीत होते? ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडतोय, देशाबाहेर साखर गेली याची जबाबदारी अमित शहा आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर आहे, असेही राजू शेट्टींनी म्हटले. काहींचे ऑफिस दुबईला आहे, काही मूठभर लोक आहेत त्यांनी हे केलंय, असा आरोपही राजू शेट्टींनी केला. इथेनॉल आणि साखरेचा काहीही संबंध नाही, मोदी है तो सब मुमकीन है. केंद्र सरकारच्या सांगण्यावर इथेनॉलमध्ये 45 हजार कोटींची गुंतवणूक केल, याची जबाबदारी कुणाची? सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांची FRP द्यावी. सरकार कमी पडत असून वेळप्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ, अशा शब्दात राजू शेट्टींनी सरकारला इशाराही दिला. 

शक्तिपीठला विरोध, तुकाराम मुंढेंचा निर्णय योग्यच

तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय चुकीचा नाही. सुर्यतेलाच्या नावाखाली पामतेल मिक्स केल जाते, याची देखील चौकशी केली पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाबाबत आम्ही एकत्रित निर्णय घेतला आहे, हा महामार्ग आम्हाला नकोय. या महामार्गात 26 हजार एकर जमीन जाणार आहे, त्यातील 19 हजार एकर बागायती आहे. देवाचे नाव घेवून सरकार रस्ता बनवत आहे, सावता माळी यांच्या गावातून त्यांच्या स्मरकावरून रस्ता नेत आहेत, असे म्हणत राजू शेट्टींना शक्तिपीठ महामार्गास आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा

शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!