Students outraged over invitation to Chief Justice Surya Kant: हैदराबाद येथील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR) विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावरून वाद निर्माण झाला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे, ज्याला सध्या विद्यापीठ सोडत असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने विरोध केला आहे. 2026 च्या तुकडीतील विद्यार्थ्यांच्या एका गटाने विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आणि विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून प्रशासनाला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. अलीकडील घटनांचा संदर्भ देत, विद्यार्थ्यांनी असा युक्तिवाद केला आहे की सरन्यायाधीशांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणे हे घटनात्मक उत्तरदायित्व आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या मूल्यांचे उल्लंघन आहे.
विद्यार्थ्यांनी पत्रात काय लिहिले आहे?
विद्यापीठ प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात विद्यार्थ्यांनी लिहिले आहे, "तरुणांना कॉकरोच म्हणण्यापासून ते पोलिसांच्या क्रूरतेचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही, अशी असंवेदनशील विधाने करण्यापर्यंत, सरन्यायाधीशांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांप्रति उदासीनता दाखवली आहे." अशा परिस्थितीत, त्यांना आमच्या महाविद्यालयात आमंत्रित करणे आणि त्यांच्याकडून आमच्यासाठी शैक्षणिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पदव्या स्वीकारणे, आम्हाला योग्य वाटत नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला विनंती केली की, "आम्ही विद्यापीठ प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी CGI ला आमंत्रित करण्याच्या आपल्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा. आम्हाला आशा आहे की विद्यापीठ याला केवळ एका तुकडीची मागणी न मानता, सर्व पदवीधर विद्यार्थ्यांची ही एक सामायिक समस्या म्हणून पाहील."
प्रशासनाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा
विद्यार्थ्यांचे हे पत्र समोर आल्याने कायदेशीर वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तथापि, या प्रकरणी NALSAR विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही.
सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर काॅकरोच पार्टी आली
दरम्यान, मे महिन्यात एका प्रकरणात सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याची सुनावणी करताना देशातील बेरोजगार तरुणांना झुरळे म्हटले होते. ते म्हणाले,"काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात." सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने एका वकिलाच्या ज्येष्ठ वकील दर्जा मिळवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेतली. खंडपीठाने वकिलाला फटकारत म्हटले, "समाजात आधीच असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात." खंडपीठाने म्हटले की, जगातील प्रत्येकजण ज्येष्ठ वकील होण्यास पात्र असेल, पण तुम्हाला त्याचा हक्क नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने तुम्हाला ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त केले तरी, सर्वोच्च न्यायालय तुमच्या वर्तणुकीच्या आधारावर तो निर्णय रद्द करेल. यानंतर अभिजित दिपके यांनी केलेल्या उपरोधिक ट्विटनंतर सोशल मीडियात अभूतपूर्व क्रांती होऊन काॅकरोच पार्टी जन्माला आली. यानंतर या पार्टीच्या आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद प्रधान यांची विकेट पडली.
इतर महत्वाच्या बातम्या
