New Financial Year : 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. भारतीय शेअर बाजारअनेक चढ-उतारानंतर सावरला आहे. अशा स्थितीत गेल्या 10 वर्षांच्या नोंदी पाहिल्या, तर एप्रिल महिन्यात बहुतांश वेळा हे संकेत सकारात्मक असल्याचे स्पष्ट होते. 10 वर्षांत 7 वेळा, एप्रिलमध्ये निफ्टी वाढला, तर फक्त तीन वेळा निफ्टीचा परतावा नकारात्मक होता.

आत्तापर्यंत 10 पैकी 7 वर्षात एप्रिल महिन्यात निफ्टीची स्थिती चांगली

जेएम फायनान्शियलच्या अहवालानुसार, 2015, 2012, 2022 वगळता, एप्रिल महिन्यात निफ्टीची स्थिती चांगली झाली आहे. 2018 आणि 2020 मध्ये निफ्टीने सुमारे 5 टक्के परतावा दिला. तर त्याच वेळी, निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक गेल्या 10 पैकी 8 वेळा वाढला आहे. त्याचप्रमाणे, क्षेत्रीय कामगिरीवर नजर टाकल्यास, ऊर्जा, ऑटो, धातू आणि CPSE निर्देशांक गेल्या 10 वर्षांत 8 वेळा ग्रीन झोनमध्ये बंद झाले आहेत. जर मार्चमध्ये वाढ झाली तर पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिलमध्ये ही वाढ कायम राहू शकते. मार्च महिन्यात निफ्टीने सुमारे 6 टक्क्यांनी झेप घेतली आहे. 1996 पासूनच्या घसरणीचा दीर्घकाळ खंडित केला.

2028 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता

2028 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताची अर्थव्यवस्था 2026 पर्यंत 3.6 ट्रिलियन डॉलरवरुन वरुन 4.7 ट्रिलियन डॉलरवरुन  जाऊ शकते. विदेशी गुंतवणूकदारांच्या परतावामुळे बाजारात नवा उत्साह आला आहे आणि यामुळे बाजारातील मंदीचा प्रभाव कमकुवत झाला आहे. बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचा परतावा, बाजारातील तीव्र घसरणीनंतरचे मूल्यांकन आणि आर्थिक वाढीमध्ये सुधारणा, एप्रिलमध्ये चांगली कामगिरी आणि वाढ अपेक्षित आहे.

भारतीय शेअर बाजारात कधी तेजी तर कधी घसरण

भारतीय शेअर बाजारात कधी तेजी तर कधी मोठी घसरण होतेआहे. गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. घसरणीची विविध कारणे सांगण्यात येत आहेत. घसरणीचं प्रमुख कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली समभागांची विक्री होय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यांच्या टॅरिफ वॉरमुळं जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक बाजारातील तणाव वाढत असतानाच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातील त्यांच्या समभागांची विक्री सुरु करण्यात आली आहे. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 30000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. 2025 च्या पहिल्या अडीच महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1 लाख 42 हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

भारताची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, फक्त चार गोष्टींवर कामं करावं लागणार, नंदन निलेकणींची मोठी भविष्यवाणी